Tuesday, May 28, 2024

‘इतिहास माहिती नसेल तर पुस्तके पाठवतो’, छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने भडकले अमोल कोल्हे, व्हिडिओतून भाजपवर टीका

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि राजकारणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवाजी महारांजाच्या अनेक मालिकांमध्ये भूमिका निभावल्या आहेत. त्यांचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यांनी व्हिडिओमध्ये महाराजांविषयी चुकीचे वक्तव्य केल्यामुळे संताप व्यक्त केला आहे.

मराठी मातीचे प्रसिद्ध अभिनेता आणि राजकारणी अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी भाजपच्या प्रवक्त्याने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे संताप व्यक्त केला आहे. त्याशिवाय त्यांच्या चुकीच्या विधानामुळे राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे. विविध स्तरातून भाजपच्या विधानाचा निषेध करण्यता येत आहे. कॉंग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजप नेत्याच्या विधानावर निषेध करत व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

झाले असे की, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता डॉ सुधांश त्रिवेदी (Sudhish Trivedi) यांनी एका वृत्तविहनीच्या मुलाखतीदरम्यान अतिश संतापजनक विधान केले होते की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची 5 वेळा माफी मागितली.’ त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यांच्या अशा विधानामुळे अनेक राजकारणी आणि मराठा समाजातील लोकांनी निषेध केला आहे. त्यामध्येच अमोल कोल्हे यांनी भाजप पक्षाला फटकार लावत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

अमोल कोल्हे यांनी आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते म्हणतात की, “डॉ सुधांश त्रिवेदी, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच औरंगजेबाल महाराष्ट्रात फरफट ओढत 28 वर्ष फिरवले होते, कारण सतनत काबुल ते बंगालपर्यत होती शेवटी त्याला महाराष्ट्रातच गाडलं हाच खरा इतिहास आहे. जर तुम्हाला हा इतिहास माहीत नसेल तर मी काही पुस्तके पाठवतो, आणि गरुडझेप चित्रपटाची लिंक देखिल शेअर करतो. छत्रपती शिवराय आमची अस्मिता आहे, तिला कोणीही डिवचू नये.”

अशा तिखट खडतर शब्दता कोल्हे यांनी भाजपला चांगलीच फटकार लावली, आणि त्यांच्या चुकीच्या विधानामुळे त्यांनी लोकांच्या आस्मितेला दु:खवल्याबद्दल त्यांनी माफी मागावी आणि आपले विधान परत घ्यावे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खुशखबर! सनी देओलचा ‘चुप रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’ आता ‘OTT’वर येण्यास सज्ज
‘मला जगू द्या…’, स्वत:शीच संसार थाटणाऱ्या अभिनेत्रीनेकाही महिन्यातच नांग्या टाकत मागितली माफी

हे देखील वाचा