Monday, October 14, 2024
Home बॉलीवूड ‘आदिपुरुषला बॉयकॉट करा’ म्हणत नेटकऱ्यांनी चित्रपटाच्या नव्या पोस्टरवरील ‘त्या’ चुकीवर घेतला आक्षेप

‘आदिपुरुषला बॉयकॉट करा’ म्हणत नेटकऱ्यांनी चित्रपटाच्या नव्या पोस्टरवरील ‘त्या’ चुकीवर घेतला आक्षेप

लवकरच दिग्दर्शक ओम राऊत त्याचा आगामी ‘आदिपुरुष’ हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतेच राम नवमीच्या मुहूर्तावर या सिनेमाचे एक पोस्टर प्रदर्शित केले गेले. या पोस्टरमध्ये अभिनेता प्रभास राम, सनी सिंग लक्ष्मण, कृती सेनन सीता आणि देवदत्त नागे हनुमान यांच्या रूपात दिसत आहे. हे पोस्टर पाहून पुन्हा एकदा एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. हे नवीन पोस्टर पाहून नेटकऱ्यांनी ओम राऊतला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

आता जे राम नवमीच्या मुहूर्तावर पोस्टर प्रदर्शित झाले आहे, त्यावर पुन्हा एकदा वाद सुरु झाला आहे. यावेळी वादाचे कारण आहे, कृतीच्या लूकमधील एक चूक. सोशल मीडियावर #आदिपुरुष हा नवीन ट्रेंड सुरु झाला असून, त्यामध्ये अनेकांनी हे पोस्ट पाहून आनंद व्यक्त केला आहे तर अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे.

सैफ अली खाननंतर आता कृतीच्या लूकवर अनेकांनी बोट ठेवले आहे. लोकांनी आरोप केला आहे की, निर्मात्यांनी सीता मातेच्या लूकवर छेडछाड केली आहे. या पोस्टमध्ये सीता मातेच्या भांगेत कुंकूच नाही. नेटकऱ्यांनी पोस्टमधली ही चूक शोधली आणि सोशल मीडियावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे.

 

एका युजरने कमेंट करत लिहिले, “विश्वास बसत नाही की या प्रोजेक्टमध्ये मनोज मुंतशीर देखील आहे, यामध्ये सीतेच्या भांगेत कुंकूही नाही.” तर दुसऱ्याने लिहिले, “आता काय बदलले आहे? दोन महिन्यांपूर्वी ज्या गोष्टींवर त्यांनी टीका केली होती त्याच गोष्टीचे हे लोकं कौतुक का करत आहेत? मला कोणत्याही पात्राच्या पोशाखात बदल झालेला दिसत नाही. निदान आता तरी रावानुद्दीन रावणसूर झाला असेल अशी आशा आहे.” एकाने लिहिले, “सीता मातेच्या भांगेत कुंकू नाही, हे कसे काय विसरू शकता.”

पुढे एका नेटकाऱ्याने कमेंट करत थेट निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना सल्लाच देत लिहिले, “आदिपुरुष चित्रपटात हनुमान यांना दाढी तर दाखवली मात्र त्यांना मुस्लिमांप्रमाणे मिशा नसलेले दाखवले आहेत. त्यांना मिशी असलेले श्री राम आणि श्री लक्ष्मण या दोघांसोबत दाखवले आहेत. हे आपल्या शास्त्रातील वर्णनाच्या विरुद्ध आहे. शिवाय रावणाने सीता मातेचे अपहरण केले होते, तरीही ते त्याची बाजू दाखवून अपहरण योग्य असल्याचे दाखवणार आहेत. आदिपुरुषला बॉयकॉट करा. बॉलिवूड आमच्या धर्मावर आघात करत आहेत. त्याऐवजी अरुण गोविल यांचे रामायण पाहा.” एकाने तर थेट ओम राऊतला व्यसनाधीन म्हटले आहे. त्याने लिहिले, “मला वाटते की ओम राऊत हा ड्रग अॅडिक्ट आहे.”

दरम्यान याआधी आदिपुरुष सिनेमाच्या टिझरवरून देखील मोठा कलह उठला होता. लोकांनी रावणाच्या भूमिकेत असलेल्या सैफ अली खानच्या लूकवर आक्षेप घेतला होता. त्याच्या अवधलेल्या दाढीची तुलना मुघलांसोबत केली होती. हा वाद इतका विकोपाला गेला की, निर्मात्यांनी थेट चित्रपटाचे प्रदर्शनच पुढे ढकलले. यानंतर दिग्दर्शकांनी या सिनेमात अनेक बदल करायला सुरुवात केली, त्यामुळे वाढलेले बजेट ऐकून लोकांना मोठा धक्का देखील बसला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिंहासनासाठी होणार महायुद्ध; ‘पोन्नियन सेल्वन 2’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, ऐश्वर्या राय ठरली लक्षवेधक

ये रिश्ता क्या कहलाता है? परिणीती चक्क पॅपराझींना टाळत बसली राघव चढ्ढाच्या गाडीत अन्…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा