Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड अभिनंदन! बॉलिवूडमधील ‘हा’ प्रसिद्ध गायक लवकरच होणार बाबा, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी

अभिनंदन! बॉलिवूडमधील ‘हा’ प्रसिद्ध गायक लवकरच होणार बाबा, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत असून, काही कलाकार आईबाबा झाले आहे. एकूणच काय तर बॉलिवूडमध्ये सध्या आनंदाचे वातवरण आहे. यातच आता अजून एका कलाकाराने एक गोड बातमी देत सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. गायक आदित्य नारायण लवकरच बाबा होणार आहे. आदित्यने सोशल मीडियावरून ही गोड बातमी शेअर केली आहे. आदित्यची पत्नी श्वेता अग्रवाल प्रेग्नेंट असून, ती आणि आदित्य लवकरच आईबाबा होणार आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनासनंतर आदित्य आणि श्वेता त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक झाले आहे.

आदित्य नारायणाने सोशल मीडियावर त्याचा आणि श्वेताचा एक सुंदर फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्या दोघांनी मॅटर्निटी फोटोशूट केले असून, त्यातलाच एक फोटो शेअर करत आदित्यने कॅप्शनमध्ये लिहिले, “श्वेता आणि मी हे सांगताना खूपच ब्लेस्ड आणि ग्रेटफूल झाले आहोत की, आम्ही लवकरच आमच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहोत.” त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये आदित्य आणि श्वेता खूपच खुश आणि आनंदी दिसत आहे. या फोटोमध्ये श्वेताने जीन्स आणि लोकरीचा आकाशी रंगाचा क्रॉप टॉप घातला असून, आदित्यने पांढऱ्या रंगाचा टि शर्ट आणि जीन्स घातली आहे. आदित्य सोफ्यावर बसून श्वेताला मिठी मारताना दिसत आहे. या फोटोमध्ये आईवडील होण्याचा दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि श्वेताच्या चेहऱ्यावरचा ग्लो खूपच स्पष्ट दिसत आहे.

आदित्यने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “मी या गोड बातमीसाठी खूपच उत्सुक होतो. मी आणि श्वेता आता आमच्या जीवनातील या नवीन प्रवासाची आतुरतेने वाट बघत आहोत. मला आधीपासूनच मुलांची खूपच हौस होती. मला देखील माझे बाळ पाहिजे होते. आम्ही लवकरच अतिशय जवळच्या लोकांच्या उपस्थितीत श्वेताचे डोहाळेजेवण करणार आहोत. मी मागील काही वर्षांपासून खूप मेहनत करत आहे, कारण मला माझ्या पत्नीला आणि परिवाराने चांगले जीवन दयायचे आहे. आता लवकरच माझे मोठे स्वान सत्यात येणार आहे.” पुढे आदित्य म्हणाला, “मला मुलीची खूपच हौस असून, आम्हाला पहिली मुलगी व्हावी अशी माझी इच्छा आहे. शिवाय या बातमीमुळे माझे आईवडील देखील खूपच खुश आहे.” श्वेता आणि आदित्यने २०१० साली आलेल्या ‘शापित’ सिनेमात एकत्र काम केले होते. त्यानंतर त्यांनी एकमेकाना डेट करायला सुरुवात केली आणि १ डिसेंबर २०२० मध्ये लग्न केले.

हेही वाचा :

हे देखील वाचा