×

फाल्गुनी पाठकच्या गाण्याने मिळाली ओळख, पण एमएमएस लीक झाल्यावर चांगलीच वादात सापडली होती रिया सेन

रिया सेन (Riya Sen) ही अशा बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, जिच्या कारकिर्दीला वादांच्या भोवऱ्याने ग्रहण लागले होते, जे कधीच संपले नाही. सोमवारी (२४ जानेवारी) रिया सेनचा वाढदिवस आहे. प्रसिद्ध हिंदी आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री मुनमुन सेनची मुलगी रिया आज तिचा ४१वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या हिट चित्रपटांपैकी फक्त ‘स्टाईल’, ‘झंकार बीट्स’ आणि ‘अपना सपना मनी-मनी’ हेच चित्रपट प्रेक्षकांना लक्षात असतील. पण तिच्याशी निगडित वाद चाहत्यांना अधिक आठवतात.

View this post on Instagram

A post shared by Riya sen (@riyasendv)

बालकलाकार म्हणून केली कारकिर्दीला सुरुवात
रियाने १९९१ मध्ये बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. रिया ही देव वर्मा आणि मुनमुन सेन यांची मुलगी आहे. ती अभिनेत्री रायमा सेनची धाकटी बहीण देखील आहे. ती त्रिपुराच्या राजघराण्यातील आहे. तिचे वडील भरत देव वर्मा हे कूचबिहारच्या राणी इला देवी यांचे पुत्र आहेत.

View this post on Instagram

A post shared by Riya sen (@riyasendv)

बी-ग्रेड चित्रपटांमध्ये केलंय काम
रियाला पहिली ओळख फाल्गुनी पाठकच्या ‘चुडी जो खनकी हाथो में’ गाण्यातून मिळाली. स्टारकिड असूनही रिया यशस्वी अभिनेत्री म्हणून स्वत:ला स्थापित करू शकली नाही. ती नेहमीच तिच्या चित्रपटांमध्ये बोल्ड आणि हॉट सीन्ससाठी चर्चेत असते. आता ती पूर्णपणे बंगाली चित्रपटांकडे वळली आहे.

View this post on Instagram

A post shared by Riya sen (@riyasendv)

अफेअर्सची लांबलचक यादी
रिया तिच्या अफेअरमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या बॉयफ्रेंडमध्ये अक्षय खन्नापासून ते लेखक सलमान रश्दी यांच्या नावांचा समावेश आहे. तर सलमान रश्दीचे वय रियापेक्षा दुप्पट होते. काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघेही वेगळे झाले, पण दोघांनी ही गोष्ट कधीच मान्य केली नाही. २०११ मध्ये ती अनेक वेळा स्टेडियममध्ये श्रीसंतला चिअर करताना दिसली होती. रिया सेनने २०१७ मध्ये तिचा प्रियकर शिवम तिवारीसोबत एका खासगी समारंभात लग्न केले.

View this post on Instagram

A post shared by Riya sen (@riyasendv)

लीक झाला एमएमएस
रियाच्या आयुष्यातील सर्वात मोठा वाद म्हणजे तिचा अभिनेता अश्मित पटेलसोबतचा एमएमएस लीक झाला. या व्हिडिओमध्ये ते एकमेकांना किस करताना दिसत होते. २००५ मध्ये रिया आणि अश्मित रिलेशनशिपमध्ये होते. त्यादरम्यान रियाचा एक चित्रपट प्रदर्शित होणार होता. लोकांचा आरोप आहे की, रियानेच प्रसिद्धीसाठी हा व्हिडिओ लीक केला होता. मात्र दोघांनीही हा व्हिडिओ फेक असल्याचे म्हटले होते.

हेही वाचा :

Latest Post