Wednesday, July 3, 2024

गायक उदित नारायण बनले आजोबा! मुलगा-सुन यांनी दिली गुड न्यूज

अभिनेता आणि होस्ट आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता अगरवाल यांनी मागील काही दिवसांपासून बेबी शॉवरचे फोटो शेअर करून ते आई बाबा होणार आहेत. हो गोड बातमी चाहत्यांना दिली होती. अशातच त्यांच्या घरी एका छोट्या परीचे आगमन झाले आहे. श्वेताने २४ फेब्रुवारी रोजी मुलीला जन्म दिला आहे. परंतु त्यांनी ही बातमी अजूनही कोणाला सांगितली नव्हती. आता त्यांनी ही बातमी सांगितल्याने सोशल मीडियावर त्यांना सगळेजण शुभेच्छा देत आहेत. आदित्यला देखील मुलगीच पाहिजे होती आणि आता त्याची ही इच्छा पूर्ण झाली आहे.

आदित्य नारायणने त्याच्या मुलाखतीत सांगितले की, ” मला सगळेजण म्हणायचे की, मला मुलगा होणार आहे. परंतु मला मनातून कुठेतरी असे वाटत होते की, मला मुलगीच झाली पाहिजे. मला असे वाटते की, एक वडील आपल्या मुलीच्या खूप जवळ असतात. मला खूप आनंद होत आहे की, आम्हाला मुलगी झाली आहे. मी आणि श्वेता. आई वडील बनून खूप खुश आहे. जेव्हा श्वेताची डिलिव्हरी होत होती तेव्हा मी तिच्यासोबतच होतो. मला असे वाटते की, केवळ महिलांमध्येच मुलांना जन्म देण्याची शक्ती असते. श्वेतासाठी माझे प्रेम आणि आदर दुप्पट झाले आहे. एका मुलाला जन्म देण्यासाठी आईला खूप वाईट परिस्थितीतून जावे लागते.”

आदित्यने सांगितले की, घरात मुलगी आल्याने सगळेच खूप खुश आहेत. त्याचे वडील उदित नारायण यांना देखील आजोबा झाल्याचा खूप आनंद झाला आहे. ते नवीन बाळाला सारखेच पाहत असतात. ते बाळाला एंजेल या नावाने आवाज देतात. आदित्य आणि श्वेताने २०२० मध्ये लग्न केले. त्याआधी बराच काळ ते एकमेकांना डेट करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी बेबी शॉवर शूट केले होते आणि सोशल मीडियावर शेअर केले होते.

हेही वाचा :

हे देखील वाचा