Friday, March 29, 2024

‘मेरी जान’ गाण्याचे प्रमोशन करताना अक्षय कुमारने चाहत्यांना दिली अनोखी ऑफर, वाचा

अक्षय कुमार आणि क्रीती सेनन यावेळी त्यांचा आगामी चित्रपट ‘बच्चन पांडे’च्या शूटिंग मुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाबाबत एकानंतर एक अपडेट समोर येत आहेत. अशातच बच्चन पांडेचा एका धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे रोमँटिक गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘मेरी जान’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात अक्षय आणि क्रितीची जबरदस्त केमेस्ट्री पाहायला मिळत आहे. क्रिती सेनन सोशल मीडियावर या गाण्याचे प्रमोशन करत आहे.अशातच अक्षय कुमारने या गाण्याला प्रमोट करण्यासाठी नवीन आयडिया शोधून काढली आहे. तो चाहत्यांना गाण्यावर रील बनवण्याची ऑफर देत आहे.

अक्षय कुमारने सोशल मीडियावर ‘मेरी जान’ या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि चाहत्यांना या गाण्यावर व्हिडिओ बनवण्यासाठी सांगितले आहे. तसेच त्याने ऑफर दिली आहे की, ज्याची कोणाचील रील त्याला आवडेल तो ती रिल शेअर करणार. (Bachchan Pandey Akshay Kumar will share the best reel made on the song meri jaan meri jaan)

अक्षय कुमारने ही पोस्ट शेअर करून लिहिले आहे की, “तुम्ही त्याला प्रेमाने बेबी, बाबा आणि मेरी जान देखील म्हणू शकता. नावं वेगळी असू शकतात परंतु प्रेमाची भाषा एकच आहे.” अक्षय कुमारने चाहत्यांना या गाण्यावर रिल बनवण्यासाठी प्रेरित करत लिहिले आहे की, “मेरी जान मेरी जानचा वापर करत तुम्ही कोणत्या तरी खास व्यक्तीसाठी किंवा त्याच्यासोबत रिल बनवा आणि मी मला आवडणारी रिल पुन्हा एकदा शेअर करेल. तुमचे प्रेम पाहण्यासाठी मी वाट पाहत आहे.”

‘बच्चन पांडे’ या चित्रपटात अक्षय कुमार सोबत क्रिती सेनन दिसत आहे. तसेच तिच्यासोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस देखील दिसत आहे. हा चित्रपट होळी निमित्त म्हणजेच १८ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार एका गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसत आहे.

हेही वाचा :

 

 

हे देखील वाचा