Tuesday, July 9, 2024

पुष्करसोबत रितेश देशमुख आणि मंजिरीचा थ्रिलर अंदाज, ‘कू’वर शेअर केला ‘अदृश्य’चा एक्सक्लुजिव ट्रेलर

मराठीसह बॉलिवुडमध्येही आपल्या अभिनयाचा दमदार ठसा उमटवणारे नाव म्हणजे पुष्कर जोग. हटके भूमिकांमुळे पुष्करने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. ‘जबरदस्त’, ‘धूम 2 धमाल’, सत्य, सासूचं स्वयंवर अशा मराठी सिनेमांसह ‘जाना पहेचाना’, ‘इएमआय’ अशा हिंदी सिनेमांमधून पुष्कर रसिकांच्या गळ्यातला ताईत बनला.

सध्या पुष्करची एक पोस्ट चर्चेत आहे. त्याचा आगामी सिनेमा ‘अदृश्य’ 13 मे रोजी रिलीज होतो आहे. या सिनेमाचा लक्षवेधी ट्रेलर पुष्करने आज ‘कू’वर शेअर केला आहे. 1 मिनीट 42 सेकंदाच्या या ट्रेलरमधून सिनेमा किती रोमांचक असेल याचा अंदाज येतो. सुरवातीलाच मंजिरी फडणीस आणि त्यानंतर लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख व पुष्कर जोग दिसतात. सिनेमा रहस्य, थरार आणि रोमांच यांनी पुरेपुर भरलेला आहे हे ट्रेलर पाहताना जाणवत राहते.

‘सानिका शोधू शकेल का ’अदृश्य’ चेहऱ्यामागचे रहस्य … सादर आहे ’अदृश्य’ चित्रपटाचा ट्रेलर…
#अदृश्य १३ मे पासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात…’ असे पुष्करने ट्रेलर शेअर करताना लिहिले आहे.

‘अदृश्य’ चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी यावर क्लिक करा

काही काळापूर्वीच ‘अदृश्य’चे एक्सक्लुजिव पोस्टरही पुष्करने ‘कू’ वर रिलीज केले होते. पुष्कर सोशल मीडियावरही कायम सक्रीय असतो. त्याने वैयक्तिक आयुष्यासह आगामी चित्रपटांबद्दल केलेल्या पोस्ट्सना चाहते कायमच उचलून धरतात.

‘अदृश्य’ सिनेमात रसिकांना थ्रिलरचा तडका अनुभवायला मिळणार आहे. या सिनेमात लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख, मंजिरी फडणीस यांच्यासह पुष्कर मुख्य भूमिकेत असणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर कबीर लाल यांचे आहे. अजय कुमार सिंह आणि रेखा सिंह हे निर्माते आहेत. आपला आगळा ठसा उमटवलेल्या मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि अनंत जोगही यात खास भूमिकांमध्ये बघायला मिळतील.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा