Tuesday, July 9, 2024

अफगाणिस्तान संकटात असताना व्हायरल होतोय ‘रेम्बो ३’ चित्रपटाचा ‘हा’ सीन; काय आहे नेमकं कारण?

हॉलिवूड चित्रपटांचे चाहते संपूर्ण जगभरात आहेत. या चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणारे ऍनिमेशन, कलाकारांचा दमदार अभिनय आणि चित्रपटांच्या कहाण्या यामुळे हॉलिवूड चित्रपटसृष्टी चांगलीच गाजली आहे. त्यांच्या दर्जेदार चित्रपटांनी त्यांनी संपूर्ण जगभरातील रसिकांची मने जिंकली आहेत. दरम्यान सध्या अफगाणिस्तानात सुरू असलेला धुमाकूळ, नागरिकांवर होणारे अमानुष अत्याचार, नि:ष्पापांचा जात असलेला बळी, या सर्व घटना वेगवेळ्या वृत्तांमधून दररोज आपण ऐकत आहोत, पाहत आहोत. तर तालिबानच्या क्रूरतेवर प्रकाश टाकणाऱ्या हॉलिवूड चित्रपटाचा एक व्हिडिओ या दरम्यान मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ म्हणजे ‘रेम्बो ३’ या चित्रपटातील एका सीन आहे. साल १९८८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटामध्ये नायक अफगानिस्तान-सोव्हिएत युद्धामध्ये त्याच्या मित्राला वाचवण्यासाठी अफगानिस्तानला जातो असे दाखवण्यात आले आहे. जेव्हा तो अफगानिस्तानात पोहचतो, तेव्हा अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमध्ये देखील एक शीतयुद्ध सुरू असते. त्यामुळे अमेरिका आपल्या शत्रू सोव्हिएत युनियनसह अफगानिस्तानला लढायला सांगते. अशा पद्धतीचा चित्रपटातील हा सीन बराच मोठा आहे. या सीनला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. ( afghanistan crisis this scene of the film rambo iii went viral on the internet know what is the matter)

सध्या संपूर्ण जगाचे लक्ष अफगाणिस्तानकडे लागलेले असताना, या सीनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कर्नल ट्रॉटमॅन आणि ज़ायसेन या दोघांमध्ये गंभीर बातचीत सुरू आहे. तसच ट्रॉटमॅन अफगाणिस्तानमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारून चौकशी करत आहेत. यामध्ये ट्रॉटमॅन ज़ायसेनला म्हणतात की, “स्वातंत्र्याच्या नावाखाली पूर्व- मध्य असं युद्ध करणे किती मूर्खपणाच काम आहे.”

साल १९८८ मध्ये पिटर मेकडोणल्ड दिग्दर्शित या चित्रपटाला त्याकाळी प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या चित्रपटामध्ये असलेल्या ऍक्शन आणि ड्रामाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई देखील केली. सध्याच्या अफगाणिस्तानातील परिस्थितीमुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा या चित्रपटाची आठवण होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ फेम अक्षरा सिंगचं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले तब्बल ‘इतके’ व्ह्यूज

-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’नंंतर आता कंगना रणौतचा ‘थलायवी’ देखील होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

हे देखील वाचा