Tuesday, July 9, 2024

रुग्णालयात दाखल झालीय देवोलीना भट्टाचार्जी, ‘या’ प्रसिद्ध गायिकेने घेतली अभिनेत्रीची भेट

‘बिग बॉस १५’ च्या विजेतेपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याचा निकाल काही तासांवर येऊन ठेपला आहे. या लोकप्रिय शोचा विजेता कोण होणार, याबद्दल सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. मात्र या शोमधील स्पर्धक देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) दुखापतीमुळे कार्यक्रमाच्या बाहेर पडली आहे. यावेळी तिला भेटायला गेलेल्या अफसाना खानने (Afsana Khan) याबद्दलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

टीव्हीचा सर्वात प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो ‘बिगबॉस १५’ आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे आणि लवकरच या पर्वाचा विजेता समोर येणार आहे. त्याचवेळी देवोलिना भट्टाचार्जी दुखापतीमुळे बेघर झाली आहे. वास्तविक, टास्कदरम्यान ती जखमी झाली होती, त्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. तिला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे अफसाना खान भेटायला पोहोचली.

बिगबॉसमधून बाहेर पडल्यानंतर देवोलिना भट्टाचार्जीने लाईव्ह सेशनमध्ये तिच्या दुखापतीबद्दल माहिती दिली. यावेळी पोल टास्क करत असताना तिला गंभीर दुखापत झाली असून, तिच्या एका नसाला इजा झाल्याचे तिने सांगितले होते. यावेळी अभिनेत्री खूपच भावूक दिसत होती. यावेळी बोलताना ती म्हणाली, “माझा एमआरआय करण्यात आला आहे. माझी प्रकृती खूप गंभीर आहे. १९ तास खूपच जबरदस्त होते. पाय घसरल्यामुळे दुखापत जास्त वाढली. मला गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून शुक्रवारी माझे ऑपरेशन होणार आहे. मी या गोष्टीशी लढा देईन. पण याबाबतही चिंताही वाटत आहे. मला फक्त तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी मला तुमच्याशी बोलायचे होते.”

दरम्यान ‘बिग बॉस १५’ च्या विजेतेपदावर कुणाचे नाव कोरले जाणार, याचा काही काळातच निकाल समोर येणार असून सर्वजण नाव जाणून घेण्यास उत्सुक आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा