खुश खबर! नागा चैतन्यसोबत घटस्फोटानंतर, दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर समंथाने दिली आनंदाची बातमी


दाक्षिणात्य चित्रपटांतील अभिनेत्री समंथाच्या आयुष्यात गेल्या काही दिवसांपासून अडचणी सुरू आहेत. घटस्फोटानंतर अभिनेत्री काहीवेळा सोशल मीडियावर झळकली. त्यावेळी ती खूप उदास आणि नाराज दिसली. मात्र आता ती स्वतःला या सर्वांमधून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. अशात तिच्या आयुष्यात एक गोड बातमी आली आहे.

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तिने तिच्या चाहत्यांना ही गोड बातमी सांगितली आहे. त्यामुळे चाहते देखील काही क्षण सुखावले आहेत. समंथा लवकरच तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे. ड्रीम वॉरिअर्स पिक्चर्स या प्रोडक्शन हाऊसने त्यांच्या आगामी चित्रपटापाची घोषणा केली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री समंथा मुख्य भूमिका साकारणार आहे.

मात्र या चित्रपटाचे शीर्षक अद्याप तयार झालेले नाही. नवोदित शांतारुबन ज्ञानशेखरन या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तसेच हा चित्रपट दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तेलुगू आणि तमिळ या भाषांचा समावेश आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाची घोषणा करताना चित्रपटाचे एक पोस्टर देखील प्रदर्शित केले आहे. यावेळी समोर आलेल्या फोटोंमध्ये समांथा थोडी उदासच दिसत आहे.

चित्रपटाशी सध्या अनेक कलाकारांची नावे जोडली जात आहेत. परंतु अद्याप त्यांच्या नावांची काहीच शाश्वती मिळालेली नाही. एसआर प्रकाश बाबू आणि एसआर प्रभू चित्रपट प्रोड्यूस करणार असल्याची चर्चा सुरू आहे. अभिनेत्री लवकरच ‘शाकुंथलम’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे.

समंथाच्या घटस्फोटानंतर नागा चैतन्यच्या तुलनेत तीच सोशल मीडियावर जास्त झळकत आहे. बऱ्याच लोकांनी तिला ट्रोल देखील केले. घटस्फोटाला तीच जबाबदार असल्याची देखील चर्चा होती. समांथा घटस्फोटानंतर सार्वजनिक ठिकाणी पहिल्यांदा एका दवाखान्यात दिसली होती. त्यावेळी देखील ती उदास होती. सोशल मीडियावर तिला ट्रोल केल्याने तिला आणखीनच वाईट वाटत होते. मात्र आता तिने तिच्या आयष्यातल्या खासगी गोष्टींचा परिणाम कामावर होऊ न देण्याचे ठरवले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-घटस्फोटानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी समंथा झाली स्पॉट; चेहऱ्यावरील नैराश्य पाहून चाहत्यांच्या जीवाला घोर

-नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर समंथाचे करिअरवर लक्ष; हिंदी चित्रपटाव्यतिरिक्त साईन केले अनेक प्रोजेक्ट्स

-घटस्फोटाच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच समंथा दिसली ‘तेलुगु केबीसी’मध्ये, म्हणाली ‘मी खूप नर्वस आहे’


Leave A Reply

Your email address will not be published.