Wednesday, September 2, 2026
Home बॉलीवूड घटस्फोटानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी समंथा झाली स्पॉट; चेहऱ्यावरील नैराश्य पाहून चाहत्यांच्या जीवाला घोर

घटस्फोटानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी समंथा झाली स्पॉट; चेहऱ्यावरील नैराश्य पाहून चाहत्यांच्या जीवाला घोर

दाक्षिणात्य चित्रपटांतील अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने काही दिवसांपूर्वीच पती नागा चैतन्यबरोबर घटस्फोट घेतला होता. त्यामुळे अनेक चाहत्यांना मोठा धक्का बसला. अनेकजण सोशल मीडियामार्फत या दोघांनी घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे असे म्हणत होते, तर काही जण या दोघांच्या या निर्णयाचे स्वागत करताना दिसले. अशात नुकतीच अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे.

अभिनेत्रीचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, ती तिचा कुत्रा हशची तब्येत ठीक नसल्याने त्याला घेऊन दवाखान्यात आली आहे. ती इथे असताना तिच्या चाहत्यांनी हा फोटो क्लिक केला आहे. यामध्ये समंथाच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसत आहे.

सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिची अवस्था पाहून सर्वांना तिची काळजी वाटत आहे. अनेकांनी कमेंट करत तिला धीर देण्याचा प्रयत्न देखील केला.

नुकतीच ती ज्युनिअर एनटीआरच्या एका शोमध्ये दिसली होती. त्यावेळी ती खुश नव्हती. त्यानंतर ती तेलुगू ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये देखील आली होती. त्यावेळी देखील ती खूप उदास दिसत होती.

समंथाची घटस्फोटाची पोस्ट
समंथाने २ ऑक्टोबर रोजी घटस्फोटाबाबत तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले की, “बऱ्याच विचारविनिमयानंतर मी आणि नागा यांनी पती- पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघे खूप भाग्यवान आहोत की, मैत्री हा एक दशकाहून अधिक काळ आमच्या नात्याचा मुख्य भाग होता, आम्हाला खात्री आहे की, आमच्यामध्ये एक खास बंधन राहील.”

https://www.instagram.com/p/CUhawZvrPK9/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्रीने आजवर या सिनेसृष्टीला अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. समंथाने पहिल्या हिंदी चित्रपटही साईन केला असल्याचे, अनेकजण म्हणत आहेत. तसेच ती हे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सर्वांना सांगेल अशीही चर्चा सुरू आहे.

तिने आतापर्यंत ‘ये माया चेसावे’, ‘मॉस्कोइन कवेरी’, ‘रमैया वस्तावैया’, ‘अल्लुडु सीनू’ अशा अनेक तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता लवकरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रतिक्षा संपली! ‘भाईजान’ने जाहीर केली ‘अंतिम’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख, टिझर पाहूनच चाहते खुश

-मोठी बातमी! ईडीकडून नोरा अन् जॅकलिनला समन्स; २०० कोटींच्या खंडणी प्रकरणी अभिनेत्रींची कसून चौकशी

-शाहरुखच नाही, तर त्याच्यासारखा दिसणारा व्यक्तीही संकटात; आर्यनच्या अं’मली पदार्थ प्रकरणानंतर मिळत नाहीये काम

हे देखील वाचा