Tuesday, September 26, 2023

‘घर बंदूक बिरयानी’नंतर नागराज मंजुळेंची मोठी घोषणा, नव्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर

अतिशय लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे यांना ओळखले जाते. ते त्यांच्या उत्तम दिग्दर्शकीय सिनेमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. नागराज यांचे सिनेमे लोक आवडीने पाहतात. त्याच्या सिनेमांना लोक चांगली पसंती दर्शवात. नागराज त्यांच्या सिनेमातून नेहमीच वेगळ काहीतरी प्रेक्षकांच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांनी सैराट, नाळ, झुंड आदी अतिशय वेगळ्या आणि पठडीबाहेरील सिनेमांमधून त्यांचे वेगळेपण दाखवून दिले आहे.

आता नागराज (Nagraj Manjule) यांच्या चाहत्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकतीच नागराज यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. त्यांच्या आगामी सिनेमाचे नाव ‘बापल्योक’ (Baplyok) असे आहे. या सिनेमात बाप लेकाचा जीवन प्रवास मांडला जाणार आहे. त्यातून प्रेक्षकांना बाप लेकाची कहाणी मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. नुकतंच या चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर झळकत आहे.

नागराज यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केले आहे. हि पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये एक चौकनी कुटुंब पाहायला मिळत आहे. त्यात आई-वडिल, मुलगा आणि तिचा भाऊ पाहायला मिळत आहे. या ते सर्वजण त्या मुलाकडे बघत असल्याचे दिसत आहे. ‘बापल्योक’ चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनी केले आहे. तर ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे, आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते हे नागराज मंजुळे आहेत. या चित्रपटाची कथा विठ्ठल नागनाथ काळे यांनी लिहिली आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत. येत्या 25 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच चाहते या पोस्टवर कमेंट करून नागराज यांना हा चित्रपट बनवण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. (After ‘Ghar Banduk Biryani’, Nagraj Manjulen announced the film Baplyok)

अधिक वाचा-  
एकेवेळी ‘बीग्रेड’ सिनेमात काम करणाऱ्या मान्यताने संजय दत्तबरोबर संसार करून दाखवलाच
मोनालिसाचा सोशल मीडियावर जलवा; शॉर्ट ड्रेसमधील फोटो व्हायरल

हे देखील वाचा