एकेवेळी बीग्रेड सिनेमात काम करणाऱ्या मान्यताने संजय दत्तबरोबर संसार करुन दाखवला


बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता म्हणजे संजय दत्त. बॉलिवूडचा बाबा म्हणून संजय दत्त ओळखला जातो. संजयने २००८ मान्यता दत्तसोबत लग्न केले. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांच्या पत्नी ह्या त्या अभिनेत्यांइतक्याच प्रसिद्ध आहे. त्यात मान्यता देखील मागे नाही. मान्यता आणि संजय दत्त ही जोडी देखील प्रचंड फेमस आहे. अनेकदा या दोघांना एकत्र पाहिले जाते. आज ह्या लेखातून आम्ही तुम्हाला मान्यता दत्तबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत.

मान्यता ही जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये आली तेव्हा तिने बीग्रेड चित्रपटांमध्ये काम केले होते. संजय आणि मान्यता यांच्यात तब्बल १९ वर्षांचा फरक आहे. या दोघांच्या वयात एवढे अंतर असूनही त्यांच्यात प्रचंड प्रेम आहे. संजय आणि मान्यता यांची प्रेमकहाणी देखील खूपच सुंदर आहे. तसे पाहिले तर संजयच्या आयुष्यात खूप मुली आल्या आणि गेल्या. मात्र मान्यताने संजयला त्यावेळी साथ दिली जेव्हा त्याला खरंच कोणाची तरी गरज होती. संजयच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळात मान्यता संजयच्या सोबत उभी राहिली.

मान्यताचा जन्म २२ जुलै १९७८ मध्ये मुंबईच्या एका मुस्लिम परिवारात झाला. तिचे मूळ नाव दिलनवाज शेख होते. तिचे संपूर्ण बालपण आणि शिक्षण दुबईमध्ये झाले. मोठी झाल्यावर ती अभिनेत्री होण्याचे स्वप्न घेऊन मुंबई आली. केआरकेच्या देशद्रोही सिनेमात तिचे नाव मान्यता ठेवले होते. मान्यताचे संजयसोबतचे हे दुसरे लग्न आहे. तिचे पहिले लग्न मेराज उरर्हमान याच्यासोबत झाले होते, मात्र काही काळाने त्यांनी घटस्फोट घेतला.

मान्यताने तिच्या संघर्षाच्या काळात अनेक बीग्रेड चित्रपटांमध्ये देखील काम केले. तिचा ‘लव्हर्स लाईक अस’ या चित्रपटाचे संजयने राइट्स विकत घेतले. त्यावेळेस तिची आणि संजयची पहिली भेट झाली. हळू हळू त्यांच्या भेटी आणि बोलणे वाढू लागले आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मान्यता अनेकदा संजयच्या घरी जाऊन त्याच्यासोबत वेळ घालवायची. तो एकटा असल्याने त्याला स्वतः बनवून जेवू देखील घालायची. मान्यता संजय आणि त्याच्या परिवाराचा खूप विचार करायची. तिच्या याच चांगुलपणाने संजयचे मन जिंकले. त्यानंतर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

मान्यता संजय दत्तची एक परफेक्ट पत्नी ठरली. तिने संजय सोबत त्याच्या सर्व सुख दुखांमध्ये सोबत उभे राहून त्याला साथ दिली. मग ते त्याच्या विरोधात असलेली केस आणि तुरुंगात जाणे असो किंवा त्याला कॅन्सर झाल्याचे समजल्यावर त्याला दिलेली साथ असो. ती नेहमी त्याच्या बरोबर होती. आज त्यांच्या लग्नाला १२ वर्षांहून अधिक काळ लोटला असून त्यांचा सुखाचा संसार सुरु आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.