टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. यापूर्वी, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत स्पॉट झाली होती. त्यानंतर त्यांच्या लिंकअपच्या बातम्यांनी वेग धरला होता. त्यामुळे पलक सोशल मीडियावरही खूप चर्चेत होती. अशातच आता तिचा बॉलिवूड अभिनेता वरुण धवनसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
एका व्हिडिओमध्ये पलक बॉलिवूड अभिनेता वरुण धवनसोबत (Varun Dhawan) डान्स करताना दिसत आहे. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये पलक लाल (Palak Tiwari) रंगाच्या शॉर्ट शिमरी ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे, तर त्याचवेळी अभिनेता वरुणही निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाच्या जीन्समध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही ठुमके लावताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सनी विविध अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. वरुण आणि पलक नव्या प्रोजेक्टसाठी एकत्र आल्याचे अनेकांचे मत आहे. त्याचवेळी काही लोकांचे म्हणणे आहे की, वरुण आणि पलक म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र दिसणार आहेत. मात्र, या व्हिडिओचे सत्य अद्याप समोर आलेले नाही.
पलक सोशल मीडियावर चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी पलक तिवारी सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) या रेस्टॉरंटच्या बाहेर एकत्र दिसली होती. यादरम्यान रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दोघेही त्याच कारमधून परत गेले. मात्र, मीडियासमोर दिसताच पलकने चेहरा लपवला. पलक आणि इब्राहिमला एकत्र पाहून सोशल मीडियावर दोघांच्या डेटिंगची अटकळ सुरू झाली होती.
त्याचवेळी पलकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर ती मनोरंजन विश्वात प्रवेश केला आहे. प्रसिद्ध गायक हार्डी संधूच्या ‘बिजली बिजली’ या म्युझिक व्हिडिओमध्ये ती दिसली होती. या व्हिडिओमध्ये तिने आपल्या स्टाईलने सर्वांची मने जिंकली होती. हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. या गाण्यात दिसल्यापासून पलक खूप लोकप्रिय झाली आहे.
याशिवाय ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. याशिवाय ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते. वेस्टर्न आउटफिटमध्ये पलक जितकी हॉट दिसते, तितकीच ती एथनिक ड्रेसमध्येही सुंदर दिसते.
हेही वाचा-
- पती- पत्नीची ‘किंसींग स्पर्धा’ कधी पाहिलीये का? प्रसिद्ध कॉमेडियनने केलाय व्हिडिओ शेअर
- काय सांगता! अल्लू अर्जुनने चोरली शहनाझ गिलची स्टाईल, बिग बॉसमधील अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल
- केरळ रुग्णालयाने मॉर्गन फ्रीमन यांचा त्वचेच्या उपचारासाठी वापरला फोटो, घटनेनंतर मागितली अधिकृत माफी
- लग्नानंतर मौनी रॉय-सूरज नांबियारने केली पूल पार्टी, सर्वांसमोर केला रोमँटिक डान्स