Saturday, June 29, 2024

कमल हसननंतर सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळवलेल्या ‘या’ अभिनेत्याने, वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी केली होती आत्महत्या

तेलुगू सिनेमातील सर्वात प्रतिभावान अभिनेता उदय किरण याने ५ जानेवारी २०१४ रोजी हैदराबादच्या श्रीनगर कॉलनीतील त्याच्या अपार्टमेंटमध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले. नैराश्य आणि आर्थिक विवंचनेमुळे त्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता. उदयने २००० साली आपल्या करिअरला सुरुवात केली. कमल हसननंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवणारा तो सर्वात तरुण अभिनेता होता.

उदयचे (Uday Kiran) पहिले तीन चित्रपट चित्रम, नुवू नेनु आणि मानसंथा नुवे हे ब्लॉकबस्टर ठरले आणि सलग तीन चित्रपटांच्या यशामुळे त्याला ‘हॅट्रिक हिरो’ ही ​​पदवी मिळाली. पण यानंतर नशिबाने त्याच्यासाठी दुसरी कथा लिहायला सुरुवात केली. अनेक फ्लॉपसह उदयच्या यशाचा आलेख हळूहळू कमी होऊ लागला. करिअरच्या एका टप्प्यावर पोहोचल्यानंतर मिळालेल्या यशाला सामोरे जाणे उदयला कठीण झाले आणि पुढे तेच त्याच्या मृत्यूचे कारण बनले.

एकदा मोडला आहे साखरपुडा

वयाच्या २२ व्या वर्षी उदयने मेगास्टार चिरंजीवीची मुलगी सुष्मिताशी साखरपुडा केला होता. पण काही कारणास्तव हा साखरपुडा मोडला. त्यानंतर २४ ऑक्टोबर २०१२ रोजी उदय किरणने त्याची गर्लफ्रेंड विशितासोबत लग्न केले. मात्र लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांनी आत्महत्या करून जीवनातून ब्रेक घेतला.

कॉलेजमध्ये मॉडेलिंगला झाली सुरुवात

उदय किरणने कॉलेजमध्ये असतानाच मॉडेलिंग सुरू केले. त्याने १९९९ मध्ये मिस्टरियस गर्ल या हिंग्लिश चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. २००० मध्ये त्याने त्याचा मार्गदर्शक, सिनेमॅटोग्राफर-फिल्म दिग्दर्शक तेजा सोबत ‘चित्रम’ या तेलगू चित्रपटातून पदार्पण केले. ज्यामध्ये त्याने १७ वर्षांच्या नायकाची भूमिका केली होती.



शेवटचा चित्रपट आला होता २०१३ मध्ये

किरण शेवटचा २०१३ मध्ये आलेल्या ‘जय श्री राम’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटातील उदयच्या अभिनयावर भाष्य करताना, माध्यमांतील वृत्तात असा दावा केला आहे की, गालावर डिंपल असलेल्या एका गुबगुबीत प्रेमी मुलापासून ते मजबूत पुरुषापर्यंत, उदय किरण एका अभिनेत्यामध्ये बदलला. या चित्रपटातील त्याचा अभिनय पाहिल्यानंतर त्याची तुलना नाना पाटेकर यांच्याशी केली जाऊ शकते.

हेही वाचा :

हे देखील वाचा