Thursday, March 28, 2024

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरीजला मिळाले आहेत सर्वात जास्त व्ह्यूज, जाणून घ्या नावे

मनी हाइस्ट ही सुपरहिट वेबसीरिज प्रेक्षकांना खूप आवडली. त्यातील प्रत्येक पात्र स्वतःच खूप खास आहे. मनी हाइस्ट ही स्पॅनिश सीरिज आहे, ज्याचे मूळ नाव ‘ला कासा डे पापेल’ आहे. भारतातही या सीरिजचे चाहते भरपूर आहेत. मनी हाइस्ट ही एकमेव सीरिज नसली तरी ज्याने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. चला तर मग नेटफ्लिक्सवरील ५ सर्वोत्कृष्ट वेबसीरिजबद्दल जाणून घेऊया ज्या हिट ठरल्या आहेत.

सेक्रेड गेम्स
भारतीयांसाठी ‘सेक्रेड गेम्स’ (Sacred Games) हा पहिला नेटफ्लिक्स शो होता, ज्याने प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले. या सीरिजमधील सर्वच पात्रांनी जबरदस्त अभिनय केला आहे. ‘सेक्रेड गेम्स’ नंतर प्रेक्षकांना त्यातील पात्रांचे वेड लागले.

स्ट्रेंजर थिंग्स
स्ट्रेंजर थिंग्स (Stranger Things) या सीरिजमध्ये ८० च्या दशकातील आठवणी आगळ्यावेगळ्या भयपटात प्रेक्षकांसमोर मांडण्यात आल्या आहेत. या सीरिजमधील प्रत्येक पात्र अप्रतिम आहे. डफर बंधूंची ही कथा रसिकांच्या पसंतीस उतरली आहे.

स्क्विड गेम्स
मनी हाइस्ट (Money Heist) हा गेल्या काही वर्षांत सर्वाधिक चर्चेत असलेला शो आहे. तर स्क्विड गेम्स (Squid Game) देखील गेल्या काही वर्षातील सर्वाधिक पाहिलेला शो म्हणून उदयास आला आहे. ही कोरियन सस्पेन्स थ्रिलर सीरिज आहे. या शोचा पुढचा सीझन कधी येणार हे जाणून घेण्यासाठी या शोचे चाहते उत्सुक आहेत.

कॉल माय एजंट
कॉल माय एजंट (Call My Agent) ही फ्रेंच प्रसिद्ध सीरिजचे हिंदी व्हर्जन आहे. त्यात बॉलिवूडचे अनेक कलाकार आहेत. हा शो पाहताना तुम्हाला हलू देणार नाही.

लुपिन
लुपिन (Lupin) ही फ्रेंच सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात ७० मिलियन व्ह्यूज मिळाले होते. त्यावेळी नेटफ्लिक्सवर पाहिल्या गेलेल्या वेबसीरिजपैकी ही एक सर्वाधिक चर्चेत होती.

हेही वाचा –

बुरखा घालून चित्रपट पाहायला गेलेल्या माधुरी दीक्षितला ‘या’ कारणामुळे अर्धवट चित्रपट सोडत काढावा लागला होता पळ

हे देखील वाचा