काही दिवसांपूर्वी अभिनेता केआरके म्हणजेच कमाल राशिद खान हा त्याच्या ट्विटमुळे खूप चर्चेत होता. केआरकेवर सलमान खानकडून मानहानीची तक्रार आली होती. यावर तो म्हणाला होता की, त्याने सलमान खानच्या राधे या चित्रपटाबाबत चुकीचे वक्तव्य केले होते, त्यामुळे सलमानने हे सगळे केले आहे. मात्र, सलमान खानचे समर्थन केल्यानंतर आता मिका सिंगवर केआरकेने निशाणा साधला आहे. त्याने मिकाला नाकातून गाणारा गायक असे म्हटले आहे. मिका सिंग आणि केआरके यांच्यात चांगलेच वाद झाले आहेत.
केआरकेने एक ट्वीट करून सलमान खानचे नाव न घेता म्हटले होते की, त्याने अनेकांचे करिअर बर्बाद केले आहेत. केआरकेने लिहिले की, “जो कोणी त्याच्या विरोधात बोलला आहे त्याने त्या व्यक्तीचे करिअर बर्बाद केले आहे. मी त्याचे करिअर संपवून त्याला रस्त्यावर आणणार आहे.” तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने सलमान खानवर अनेक ट्वीट केले.
केआरकेने पुढे सांगितले की, “बॉलिवूडमधून मला खूप कॉल येत आहेत. अनेकजण मला ट्विटवर सल्ला मागत आहेत. अनेकांनी मला हे देखील सांगितले आहे की, भावा जरा जपून राहा तो तुला मारेल. तुम्हा सर्वांना माझी एवढी काळजी आहे, त्याबद्दल धन्यवाद! पण मी त्याला घाबरत नाही. मी सत्यासाठी नेहमीच लढत राहील.”
यानंतर सलमान खानने त्याच्यावर मानहानीची केस केली होती. सलमान खानला एवढं सगळं बोलल्यानंतर त्याने 27 मेला पुन्हा एकदा ट्वीट केले की, “मी आता एका गायकाचा देखील रिव्ह्यू करणार आहे, जो नाकातून गातो.”
या ट्विटवर मिका सिंगने त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. मिका सिंग म्हणाला की, “हाहाहा बेटा तू कोण आहेस? हा तुझा बाप आहे. आम्ही नाकातून गाऊन नाकातच दम आणतो.” दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्याने लिहिले आहे की, “हा फक्त बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि हळव्या लोकांसोबत पंगा घेतो. परंतु बापासोबत नाही घेणार. प्लीज माझ्या मुलाला कोणीतरी सांगा मला अनब्लॉक कर. मी करण जोहर किंवा अनुराग कश्यप नाहीये. मी तुझा बाप आहे.”
???????????????????? eh sirf Bollywood ch decent famous and soft lokkan nal pange lainda… par Baap nal nahi lega… please mere bete ko bolo mujhe unblock kare please ????????????????????????????????.. I’m not @karanjohar or @anuragkashyap72 … mai iska papa hu.. https://t.co/7Rqc2nNMz6
— King Mika Singh (@MikaSingh) May 29, 2021
त्यांचा हा वाद इथेच नाही थांबला. केआरकेने पुन्हा ट्वीट केले की, “एक चिरकुट गायक यामध्ये येऊन प्रसिद्धी मिळवायचा प्रयत्न करत आहे. पण मी त्याला ती देणार नाहीये. किती उड्या मारायच्या त्या मार बेटा. मी तुला अजिबात भाव देणार नाहीये. कारण तेवढी तुझी पात्रता नाहीये.” या ट्विटमध्ये केआरकेने कोणाचेच नाव घेतले नाही. केआरकेने आपले ट्विटर प्रोटेक्ट केले आहे. म्हणजेच केवळ त्याला फॉलो करणाऱ्या युजर्सला त्याचे ट्वीट दिसतात.
मिका सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मिका सिंग म्हणाला आहे की, “केआरकेवर केस करून सलमान भाईने खूप चांगले केले आहे. तुम्ही चित्रपटाबाबत जरूर बोला पण वैयक्तिक कोणतीही टिपण्णी करू नका. माझ्याबाबत जर काही उलटे बोलतात तर केस वैगेरे नाही, पण थेट कानाखाली मिळेल.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…