सोनाली कुलकर्णीने अलीकडेच एका कार्यक्रमात महिलांना ‘आळशी’ म्हटले आणि त्यावरून वाद निर्माण झाला. या अभिनेत्रीच्या वक्तव्यावर सर्वसामान्यांसोबतच काही कलाकारांनीही जोरदार टीका केली. त्याच वेळी, आता उर्वशी रौतेला सोनालीच्या वक्तव्यावर आपले मत मांडताना दिसली. मात्र, हे करणे उर्वशीला चांगलेच महागात पडले असून तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे.
उर्वशी रौतेला (urvashi rautela) ही सोनाली कुलकर्णीच्या वक्तव्यावर आक्षेप न घेता असे काही बाेलली, ज्यामुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे. ट्रोलर्सने उर्वशीला ‘सेल्फ ऑब्सेस्ड’ म्हणायला सुरुवात केली आहे. सोनालीच्या कमेंटवर उर्वशी रौतेलाला प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर अभिनेत्री म्हणाली, “ही गोष्ट मला लागू होत नाही. मी बाहेरची आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. मी स्वतः सर्व काही केले आहे. दोनदा मिस इंडियाचा किताब जिंकणारी मी एकमेव आहे.”
उर्वशी रौतेला पुढे म्हणाली, “मी सर्वात तरुण मॉडेल आहे, जिला मिस युनिव्हर्स जज करण्याची संधी मिळाली. त्यामुळे हे मला लागू होत नाही. हे त्या मुलींबद्दल आहे जे काहीच करत नाहीत. उर्वशीचे हे विधान समोर येताच अभिनेत्री चांगलीच चर्चेत आली आहे, तसेच युजर्स तिच्या या व्यक्तव्यार प्रतिक्रिया देत तिला जोरदार ट्रोल करत आहेत.
उर्वशी रौतेलाला फटकारताना एका युजरने म्हटले आहे की, ‘ती एक ऑब्सेस्ड महिला आहे जी फक्त मला, मला आणि मला ओळखते.’, तर दुसर्याने लिहिले की, ‘तुम्ही महिलांचे समर्थन करायला हवे होते.’ त्याचप्रमाणे इतर युजर्सही कमेंट करून उर्वशीचा क्लास घेताना दिसत आहेत.
सोनाली कुलकर्णीने महिलांबाबत काही आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांना ‘आळशी’ म्हटले होते, ज्यानंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले. प्रचंड ट्रोलिंगनंतर सोनालीने तिच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली हाेती.(after sonali kulkarni bollywood actress urvashi rautela made an objectionable statement about women)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जिनिलियाच्या तोंडून सर्वांसमोर ‘तो’ गोड शब्द ऐकून लाजेने लाल झाला रितेश देशमुख, व्हिडिओ झाला व्हायरल
राघव चड्ढा यांनी परिणीतीसोबतच्या व्हायरल व्हिडिओवर तोडले मौन; ब्लश हाेत म्हणाले…