Tuesday, June 25, 2024

“सुलोचना दीदी दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी…”, देवेंद्र फडणवीस यांनी दिला प्रतिक्रीया

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे रविवारी (4 जुन) दु: खद निधन झाले आहे. त्या 94वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना दादक येथील शुश्रूषा रुग्णालयामध्ये नेण्यात आल होत. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुलोचनादीदींच्या निधनानंतर सर्व स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

सुलोचनादीदींचे पार्थीव अंतिम दर्शानासाठी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत प्रभादेवी येथील घरी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी कलाकार मंडळी आणि राजकीय नेते सुलोचनादीदींच्या घरी पोहोचले आहेत. सुलोचना दीदींच्या पार्थीवावर सायंकाळी पाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सुलोचनादीदींचे अंतिम दर्शन घेतले आहे.

सुलोचनादीदींच्या मुत्युनंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,”चित्रपट सृष्टीत काही नावे त्यांच्या कार्यामुळे आणि कर्तृत्वामुळे अजरामर आहेत. चित्रपटसृष्टीत ज्यांची नावे आदरने घेतली जातात. त्या लिस्टमध्ये सुलोचनादीदींचे नाव आहे. सुलोचनादीदी सुरवातीच्या काळात नायिकांच्या भूमिका साकारत होत्या. पण त्या पुढे सुलोचनादीदीं आईच्या भूमिकेत दिसल्या. आमच्या पिढीने त्यांना आईच्याच भूमिकेत पाहिले आहे. त्या दादासाहेब फाळके पुरस्कार मिळण्यासाठी शंभर टक्के पात्र होत्या.”

सुलोचना लाटकर यांच्याविषयी बोलायच झाले तर, सुलोचनादिदींनी अभिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली होती. त्यांनी त्यांच्या कारकर्दीत तब्बल 250 हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. इतकेच नाही तर 50हून आधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. यासोबतच त्यांनी दिलीप कुमार आणि धर्मेंद्र यांच्यासोबतही काम केले आहे. सूर्यकांत, चंद्रकांत यांच्यासमवेत त्यांनी कोल्हापुरात ‘मोलकरीण’, ‘वहिनींच्या बांगड्या’, ‘मिठभाकर’, ‘धाकटी जाऊ’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. (After the death of Sulochana Didi Devendra Fadnavis gave a response)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हॅंडसम मुंडा! शाहिद कपूरचा राॅयल अंदाज, फाेटाे व्हायरल
रसिका अन् सिद्धार्थ यांच्या ‘Diet लग्न’चा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार चाहत्यांच्या भेटीला

हे देखील वाचा