जेष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे रविवारी (4जुन) निधन झाले आहे. त्यांना गेल्याकाही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या 94वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वात शोककाळा पसरली. त्यानंतर कलाकार आणि राजकीय मंडळींनी देखील दु:ख व्यक्त केले. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केले आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विट करताना लिहीले की, “मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रात आपल्या सहजसुंदर अभिनयाने असंख्य चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी लाटकर यांचे निधन झाले आहे. सुलोचना दिदींच्या जाण्याने अभिनय क्षेत्रातील एक असामान्य व्यक्तीमत्व हरपले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो. लाटकर कुटुंबातील सदस्य आणि सुलोचना दीदींच्या चाहत्यांना या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.”
मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रात आपल्या सहजसुंदर अभिनयाने असंख्य चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी लाटकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने अभिनय क्षेत्रातील एक असामान्य व्यक्तीमत्व हरपले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 4, 2023
एकनाथ शिंदे यांनी सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांची तब्येत खालावल्यानंतर मार्च महिन्यात मुखमंत्री सहायता निधीतून 3 लाख रुपये दिले होते. सुलोचना लाटकर यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना 3 जुन रोजी व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. मात्र, व्हेंटिलेटरवर ठेवूनही त्यांची प्रकृती सुधारली नाही. मार्च महिन्यात देखील त्यांची तब्येत ठिक नव्हती. त्यावेळी तीन आठवड्यानंतर त्यांची तब्येत सुधारली होती. सोमवारी (5 जुन) त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे बाॅलिवू़ड विश्वाला मोठा धक्का बसला आहे.
सुलोचना लाटकर यांच्याविषयी बोलायच झाले तर, सुलोचना यांंनी अभिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली होती. त्यांनी त्यांच्या कारकर्दीत तब्बल 250 हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. इतकेच नाही तर 50हून आधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. यासोबतच त्यांनी दिलीप कुमार आणि धर्मेंद्र यांच्यासोबतही काम केले आहे. (Eknath Shinde condoled the death of Sulochana Latkar)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
BREAKING! प्रसिद्ध अभिनेत्याचे कार अपघातात निधन, तीन कलाकार गंभीररीत्या जखमी; सिनेसृष्टीत शाेककळा
सलमान खानसोबत ‘जुडवा’ चित्रपटात झळकली होती रंभा, आता अभिनय सोडून करते ‘हे’ काम