Saturday, July 27, 2024

‘काश्मीर फाइल्स’ला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर विवेक अग्निहोत्रींनी केले ट्विट म्हणाले…

नुकतेच अतिशय मानाचा आणि मोठा दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा संपन्न झाला. भारतीय सिनेसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या नावावरून हा गौरव दिला जातो. मनोरंजनविश्वात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या कलाकरांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. मुंबईमध्ये नुकतेच या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावर्षी अनेक दिग्गज लोकांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. यात आलिया भेट, रणबीर कपूर, अनुपम खेर आदी कलाकारांचा समावेश आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये २०२२ वर्षात तुफान गाजलेले आणि हिट झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक असलेल्या विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आभार व्यक्त केले आहे.

काश्मीरमध्ये ९० च्या दशकात काश्मिरी पंडितांवर जो काही अन्याय झाला त्यावर अतिशय उत्तम पद्धतीने या सिनेमातून भाष्य करण्यात आले आहे. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमावर टीका देखील आणि कौतुक देखील झाले. या सिनेमाने विवेक अग्निहोत्री यांना एक नवीन ओळख मिळवून दिली.

विवेक यांनी त्यांच्या ट्विटमध्ये आभार मनात लिहिले, “‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला देण्यात आलेला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मी सर्व दहशतवाद पीडितांना आणि भारतातील सर्व लोकांना ज्यांचे चित्रपटाला आशीर्वाद मिळाले आहेत अशा समर्पित करतो.” याच सिनेमासाठी अनुपम खेर यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. सध्या विवेक अग्निहोत्री त्यांच्या आगामी ‘द व्हॅक्सीन वॉर’ या चित्रपटावर काम करत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
viral video sonu nigam : धक्कादायक! मुंबईत म्युझिक कार्यक्रमादरम्यान सोनू निगमवर झाला हल्ला
देवदूताच्या रुपात आली होती श्रीदेवी; एका निर्णयाने बदलले चित्रपट निर्मात्याचे आयुष्य

हे देखील वाचा