मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात काही दिवसांपूर्वीच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली. सध्या आर्यन खान आर्थर रोड तुरुंगात आहे. मात्र आता या केसमध्ये नवीन वळण आले आहे. एनसीबीने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांना अटक केल्यानंतर आता अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबीच्या निशाण्यावर आली आहे. एनसीबीला अनन्या विरोधात काही पुरावे मिळाले आणि एनसीबीने २१ ऑक्टोबरला अनन्याच्या घरी छापा टाकत तपासणी देखील केली, आणि तिला चौकशीसाठी समन बजावले. गुरुवार २१ ऑक्टोबरला अनन्याची एनसीबीने जवळपास सव्वा दोन तास कसून चौकशी केली.
बॉलिवूडमधील अनेक मोठमोठ्या कलाकारांना आतापर्यंत एनसीबीने चौकशीसाठी बोलावले आहे. सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर एनसीबीची करडी नजर बॉलिवूडवर फिरताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच एनसीबीने आर्यन खानला अटक केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. आरोपींच्या व्हॉट्स ऍप चॅटवरून अनन्या पांडेचे नाव समोर आल्याने तिला एनसीबीने चौकशीसाठी बोलवले. एनसीबीने अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी शोधमोहीम राबवली. आज २२ ऑक्टोबर रोजी पुन्हा अनन्याला चौकशीसाठी बोलावले आहे. एनसीबीच्या हाती आर्यन खान आणि बॉलिवूडमधील नवोदित अभिनेत्रींचे अं’मली पदार्थांवरील चॅटसमोर आले. आता अनन्याला एनसीबीने चौकशीसाठी बोलवल्यानंतर ही नवोदित अभिनेत्री अनन्याच असल्याच्या चर्चा होत आहे.
अनन्याने २०१९ साली ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र त्याला यशाची चव चाखता आली नाही. प्रसिद्धी तर मिळाली मात्र यश काही मिळाले नाही. २२ वर्षीय अनन्या अनेकदा ट्रोलिंगचा देखील सामना करताना दिसते. २१ ऑक्टोबरला शाहरुख खानच्या ‘मन्नत’वर देखील एनसीबीने तपासणी केली. शाहरुख खानने देखील आर्यनची आर्थर रोड तुरुंगात जाऊन १५/२० मिनिटे भेट घेतली.
अनन्या पांडे आणि आर्यन खान हे स्टारकिड्सच्या अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसून आले आहेत. आर्यन खानची बहीण सुहाना खान आणि अनन्या पांडे ह्या चांगल्या मैत्रिणी देखील आहे. आता या प्रकरणात अनन्याचे नाव समोर आल्याने सर्वांचेच डोळे मोठे झाले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बॅकलेस की टॉपलेस?’ नव्या आऊटफिटसह अवतरली उर्फी, तर ड्रेस पाहून चाहते पडले गोंधळात
-अनन्या पांडेच्या घरी NCB अधिकारी, चौकशीसाठी अभिनेत्रीला समन्स