Friday, January 3, 2025
Home बॉलीवूड ये रिश्ता क्या कहलाता है? परिणीती चक्क पॅपराझींना टाळत बसली राघव चढ्ढाच्या गाडीत अन्…

ये रिश्ता क्या कहलाता है? परिणीती चक्क पॅपराझींना टाळत बसली राघव चढ्ढाच्या गाडीत अन्…

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या बातम्या सध्या तुफान व्हायरल हाेत आहेत. मात्र, दोघांनीही लग्नाबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही आणि मौन बाळगले आहे. अशात बुधवारी (दि. 29 मार्च)ला लग्नाच्या बातम्यांमध्ये परिणीती चोप्रा दिल्ली विमानतळावर स्पॉट झाली. यादरम्यान राघव चढ्ढाही विमानतळावर तिला रिसीव करण्यासाठी पोहोचले. माध्यमातील वृत्तांनुसार, विमानतळावर मीडियाचे कॅमेरे टाळण्यासाठी परिणीती घाईघाईत राघव चढ्ढा यांच्या कारमध्ये बसली.

परिणिती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा (raghav chadha) यांच्या लिंक अपच्या बातम्या तेव्हा समाेर आल्या जेव्हा दोघे डिनर डेटवर एकत्र दिसले. अशात गेल्या मंगळवारी आप नेता राघव चड्ढा यांनी ट्विट करून या जाेडप्याचे अभिनंदन केले. त्यांनी पाेस्टमध्ये लिहिले, “मी @raghav_chadha आणि @Parineeti Chopra यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या नात्याला भरपूर प्रेम, आनंद आणि सहवास लाभो. माझ्या शुभेच्छा!!!

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

मुंबईतील विमानतळावर स्पॉट झाल्यानंतर परिणीतीला पॅपराझींच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली. काल रात्री मुंबई विमानतळावरून बाहेर पडल्यावर जेव्हा अभिनेत्रीला विचारण्यात आले की, ‘लग्न खरोखरच ठरले आहे का?’ यावर अभिनेत्रीने माैन बाळगले. याशिवाय इतर अनेक पॅपराझींनेही अभिनेत्रीला लग्नाची पुष्टी करत अनेक प्रश्न विचारले. अशात एका पॅपराझी अभिनेत्रीची मस्करी करत “ब्लशिंग ब्लशिंग.” असे म्हणाला, ज्यावर अभिनेत्री म्हणाली, “हम्म?

राघव चढ्ढा आणि परिणीतीबद्दल बोलायचे झाले, तर दोघांनी ब्रिटनमध्ये शिक्षण घेतले आहे. दोघेही अभ्यासात खूप हुशार आहे. मात्र, परिणीती चोप्राने तिचे करिअर चित्रपटांमध्ये केले, तर राघव चढ्ढा राजकारणाकडे वळले. राघव आम आदमी पक्षाचे नेते आहेत. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेऊन चार्टर्ड अकाउंटंटचे शिक्षण घेतले. अशात गेल्या काही वर्षांपासून ते आम आदमी पक्षाशी जाेडलेले आहेत.(raghav chadha and bollywood actress parineeti chopra spotted at delhi airport amid wedding rumors )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Myositis आजाराशी लढणारी समंथा स्टाईल म्हणून नाही तर गरज म्हणून घेते ‘या’ अ‍ॅक्सेसरीजचा आधार

‘छाेटी सरदारनी’ने लाल जाेड्यात शेअर केले सुंदर फाेटाे, एकदा पाहल तर प्रेमातच पडाल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा