दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सामंथा. केवळ साऊथच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील तिचा मोठा बोलबाला आहे. सामंथा नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी मीडियामध्ये गाजत असते. लवकरच ती शकुंतलम सिनेमात दिसणार आहे. तिचे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य नेहमीच सगळ्यांसाठी एक चर्चेचा विषय ठरला. मात्र यात अजून एका गोष्टीमुळे ती लाइमलाईट्मधे आली आणि ती गोष्ट म्हणजे तिला असणारा Myositis नावाचा गंभीर आजार.
सामंथा नेहमीच तिच्या या आजराबद्दल सगळ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत असते. याबद्दल अनेक गोष्टी तिने आतापर्यंत शेअर केल्या आहेत. मात्र नुकतेच एका मुलाखतीमध्ये तिने तिला या आजारामुळे काय काय त्रास होतो आणि कसा याबद्दल देखील भाष्य केले आहे. यावेळी ती म्हणाली, “एक वेळ अशो होती जेव्हा मी माझ्या लुकबद्दल खूपच शिस्तबद्ध आणि सजग होती. मात्र आता यावर माझा काहीच ताबा नाहीये. ”
पुढे सामंथा म्हणाली, “एक अभिनेत्री म्हणून सगळ्यांकडूनच तुम्ही नेहमीच चांगले दिसाल, किंवा दिसावे अशी अपेक्षा केली जाते. चित्रपटात असो, कार्यक्रमांमध्ये असो किंवा सोशल मीडियावर. मला नेहमीच अधिकाधिक सुंदर व्हायचे होते. सुंदर दिसायचे होते. मात्र आताच्या माझ्या परिस्थितीवर माझा कोणताच कंट्रोल नाही. एक कलाकार म्हणून नेहमीच डोळे म्हणजे एक्सप्रेशनचे एक मोठे माध्यम समजले जाते. मात्र मी जेव्हा रोज सकाळी उठते तेव्हा हेच डोळे मला त्रास देतात. सकाळी डोळ्यामध्ये मला टोचल्यासारखे जाणवते.”
सामंथा पुढे म्हणते, “मी रोजच या त्रासातून जाते. मी उजेडाबाबत खूपच संवेदनशील आहे. मी नेहमी स्टाइल अथवा मजा म्हणून चष्मा नाही घालत. उजेड माझ्या डोळ्यांना त्रास देतो, मला जास्त स्वरूपाचा मायग्रेन आहे आणि माझ्या डोळ्यांमध्ये खूप त्रास होतो. ते सुजतात. मागील ८ महिन्यापासून असे होत आहे. एक कलाकार म्हणून हे खूपच वाईट आहे. यावर मी ज्या गोळ्या घेते त्याचे देखील दुष्परिणाम होत आहे. कधी माल थकवा येतो तर कधी जाड होते.”
दरम्यान सामंथाच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, “तिचा शकुंतलम हा सिनेमा १४ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. यासोबतच ती ‘सिटाडेल’मध्ये देखील दिसणार आहे. विजय देवरकोंडासोबत ती एका तेलगू सिनेमात देखील काम करत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सैफच्या आधी अमृता पडली हाेती ‘या’ क्रिकेटरच्या प्रेमात; प्रकरण लग्नापर्यंतही पाेहाेचले हाेते, पण…
‘त्या एका कॉलने माझं लाईफ…’ अभिनेत्री जुई गडकरीने शेअर केलेली “ती” पोस्ट चर्चेत