Saturday, September 7, 2024
Home बॉलीवूड फटाके वाजवा रे! परिणीती चोप्रा अन् राघव चढ्ढाचा झाला साखरपुडा? ‘आप’ खासदार ट्वीट करत म्हणाले…

फटाके वाजवा रे! परिणीती चोप्रा अन् राघव चढ्ढाचा झाला साखरपुडा? ‘आप’ खासदार ट्वीट करत म्हणाले…

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या राघव चढ्ढासाेबतच्या तिच्या नात्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. परिणीतीचे नाव आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढासोबत जोडले जात आहे. दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या येत आहेत. परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या डेटींगच्या चर्चेदरम्यान, आप खासदार संजीव अरोरा यांनी त्यांच्या ट्विटद्वारे या जाेडप्याच्या नात्याची पुष्टी केली आहे.

राघव चढ्ढासोबतच्या रिलेशनशिपच्या बातम्यांवर परिणीती चोप्रा (parineeti chopra) हिने आतापर्यंत मौन बाळगले आहे. चाहते तिच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात या दरम्यान, आप खासदार संजीव अरोरा (sanjeev arora) यांनी दोघांचे अभिनंदन केले असून परिणीती आणि राघव चड्ढा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

संजीव अरोरा यांनी आपल्या ट्विटमध्ये परिणीती आणि राघव चढ्ढा यांचा फोटो शेअर केला. दोघांच्या फोटोसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “मी राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे मनापासून अभिनंदन करतो. तुम्हा दोघांचं नातं प्रेम, आनंद व सहवासाने भरलेलं असावं. माझ्या शुभेच्छा!”

परिणीती चोप्रा नुकतीच राघव चढ्ढासोबत मुंबईत स्पॉट झाली होती. यावेळी दोघेही एकत्र लंच आणि डिनर डेट एन्जॉय करताना दिसले. तेव्हापासून दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. मात्र, परिणीती आणि राघव चढ्ढा यांनी अद्याप या वृत्तांवर अधिकृत माहिती दिली नाही.

राघव चढ्ढा आणि परिणीतीबद्दल बोलायचे झाले, तर दोघांनी ब्रिटनमध्ये शिक्षण घेतले आहे. दोघेही अभ्यासात खूप हुशार आहे. मात्र, परिणीती चोप्राने तिचे करिअर चित्रपटांमध्ये केले, तर राघव चढ्ढा राजकारणाकडे वळले. राघव आम आदमी पक्षाचे नेते आहेत. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेऊन चार्टर्ड अकाउंटंटचे शिक्षण घेतले. अशात गेल्या काही वर्षांपासून ते आम आदमी पक्षाशी जाेडलेले आहेत.(aap mp sanjeev arora congratulates raghav chadha and bollywood actress parineeti chopra amid dating rumors )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खळबळजनक! अजून एका लोकप्रिय अभिनेत्रीने संपवले जीवन, अभिनयासोबतच गायनातही होती कुशल

‘करण-अर्जुन’ सिनेमासाठी सलमान खान नाही तर ‘हा’ सुपरस्टार होता पहिली पसंत, राकेश रोशन यांचा खुलासा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा