Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘मुलाचे नाव राम नाही…’, सैफ अली खानच्या जुन्या व्हिडिओने ‘विक्रम वेधा’ अडचणीत

सध्या बॉलिवूड चित्रपटांवर प्रेक्षकांचा चांगलाच रोष पाहायला मिळत आहे. लालसिंग चड्ढापासून सुरू झालेला हा ट्रेंड आजही सुरूच आहे. यामध्ये आता सैफअली खानच्या विक्रम वेधा चित्रपटाचीही भर पडली आहे. हृतिक रोशन आणि सैफ अली खान स्टारर ‘विक्रम वेधा’ 30 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. मात्र रिलीजच्या दोन दिवस आधीपासून पुन्हा एकदा चित्रपटाबाबत विरोध सुरू झाला असून यावेळी कारण आहे सैफ अली खान आहे. सैफचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

वास्तविक, विक्रम वेधच्या रिलीजपूर्वी सैफ अली खानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे. व्हिडिओमध्ये सैफ अली खान आपल्या मुलाचे नाव राम ठेवू शकत नाही, असे म्हणत आहे. याच व्हिडिओमध्ये करीना देखील दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये ती आपल्या मुलाचे नाव घेऊन मुघलांची स्तुती करताना दिसत आहे. सैफ आणि करिनाचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर यूजर्स चांगलेच संतापले आहेत.

या व्हायरल व्हिडिओमध्ये सैफ अली खान व्हिडिओमध्ये  ‘मी माझ्या मुलाचे नाव सिकंदर ठेवू शकत नाही आणि  त्याचे नाव रामही ठेवू शकत नाही, मग चांगले मुस्लिम नाव का नाही?’ तथापि, व्हिडिओमध्ये सैफ अली खान असेही म्हणताना दिसत आहे की तो आपल्या मुलांना धर्मनिरपेक्ष मूल्यांसह वाढवेल, जिथे ते एकमेकांचा आदर करायला शिकतील. असे म्हणताना दिसत आहेत.  त्याच्या याच व्हिडिओवर नेटकरी संतापले आहेत.

सैफ अली खानचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक युजर्स अभिनेत्यावर आपला राग काढत आहेत आणि त्याच्या विक्रम वेधा या चित्रपटावर बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा आहे. ‘विक्रम वेधा’ हा तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. तमिळ आवृत्ती 2017 मध्ये रिलीज झाली. मूळ चित्रपटात आर माधवन आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत दिसले होते. ‘विक्रम वेधा’चे दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केले आहे. तो एक अॅक्शन-थ्रिलर आहे.

‘विक्रम वेधा’ ची कथा एक कठोर पोलीस अधिकारी विक्रम (सैफ अली खान) आणि एक खतरनाक गँगस्टर वेधा (ऋतिक रोशन) यांची आहे. या चित्रपटात हृतिक आणि सैफ व्यतिरिक्त राधिका आपटे, रोहित शराफ, शारिब हाश्मा, योगिता बिहानी हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा- लता दीदींना होती महागडे दागिने अन् आलिशान गाड्यांची आवड; मागे ठेवलीये 350 कोटींहून अधिकची संपत्ती, ज्याचे वारस…
एकमेकांना भाऊ- बहीण मानणाऱ्या लता मंगेशकर आणि दिलीप कुमारांमध्ये ‘या’ कारणाने आला होता दुरावा, १३ वर्षे…
तुम्हाला माहितीये का? गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याशी श्रद्धा कपूरचं आहे खास नातं

 

हे देखील वाचा