सामान्य व्यक्तींपासून ते मोठमोठ्या कलाकारांपर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. हे लोक फक्त फोटोच नाही, तर आपला डान्स व्हिडिओदेखील इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब शॉर्ट्स या प्लॅटफॉर्मवर शेअर करतात. सध्या कशाचा ट्रेंड असेल, तर तो म्हणजे रील व्हिडिओजचा. हे लोक नवीन-जुन्या गाण्यांवर व्हिडिओ बनवून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करतात. अशात एका एअर होस्टेसचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही फिदा झाले आहेत.
दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला व्हिडिओ
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक देखणी मुलगी ‘छम्मा- छम्मा’ या हिंदी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तिचे डान्स मूव्हज खूपच भन्नाट आहेत. गाण्यातील बोलाप्रमाणे ती स्टेप्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ युजर्सला खूप जास्त आवडला आहे. तिने या व्हिडिओत पांढऱ्या रंगाच्या बूट घातला आहे. तसेच, तिने काळ्या रंगाचा टॉप आणि हिरव्या रंगाचा स्कर्ट परिधान केला आहे. या व्हिडिओला २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, या व्हिडिओला आतापर्यंत ३१ हजारांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. याव्यतिरिक्त ७०० पेक्षा जास्त युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत.
View this post on Instagram
एका युजरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, “खूप सुंदर डान्स, गोंडस दिसताय.” दुसऱ्या एकाने कमेंट करत लिहिले की, “तुमच्या नृत्य कौशल्याला तोडच नाही.” आणखी एकाने लिहिले की, “तू छम्माच दिसत आहेस.” एक युजर म्हणाला की, “तुझा डान्स आणि तू दोघेही भन्नाट.”
उर्मिला मातोंडकरच्या गाण्यावर थिरकली मुलगी
विशेष म्हणजे, या मुलीने ज्या गाण्यावर डान्स केला आहे, ते गाणे सन १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चायना गेट’ या सिनेमातील आहे. हे गाणे उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिच्यावर चित्रीत करण्यात आले होते. ती मुलगी उर्मिलाप्रमाणे स्टेप्स करताना दिसत आहे. या गाण्याला प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांनी आपला आवाज दिला होता.
कोण आहे व्हिडिओतील मुलगी?
व्हिडिओत थिरकणारी ही मुलगी इतर कुणी नसून एअर होस्टेस उमा मीनाक्षी आहे. उमा ब्रिटिश एअरवेजमध्ये काम करते. उमा हिचे इंस्टाग्रामवर ९ लाख २१ हजार फॉलोव्हर्स आहेत. तिने इंस्टाग्रामवर आतापर्यंत २६११ पोस्ट केल्या आहेत. शिवाय ती, २४२ लोकांना फॉलो करते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कार्तिकने ढसाढसा रडणाऱ्या चाहत्याला मारली मिठी, व्हिडिओ पाहून चाहत्यांनीही गायलं गुणगान
अपना टाईम लाया है! नवाजुद्दीनला करावी लागली होती वॉचमनची नोकरी, आज आहे बॉलिवूडचा महागडा सुपरस्टार
सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, तुटलेल्या हृदयासोबत अभिनेत्याने शेअर केली भावूक पोस्ट