Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

वयाने बऱ्याच मोठ्या अन् छोट्या अभिनेत्यांसोबत ऐश्वर्याने दिलेत इंटिमेट सीन; हे पाहून नाराज झाल्या होत्या सासू जया बच्चन

जिच्या अदाकारांनी अनेक तरुण तरुणी घायाळ होतात आणि जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून जीची ओळख आहे, ती म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन होय. ती सतत तिच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांचं लक्ष वेधत असते. तिने आजपर्यंत अनेक छोट्या-मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे. चित्रपटसृष्टीत काम करताना अनेक वेळा लहान-मोठ्या कलाकारांसोबत कामाचा भाग म्हणून ऑन स्क्रीन रोमान्स करावा लागतो, अनेक बोल्ड सीन्स द्यावे लागतात. यामुळे कधीकधी घरच्यांचा रोष देखील पत्करावा लागतो. याचेच एक उदाहरण म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने केलेल्या बोल्ड सीनमुळे, अभिनेत्री जया बच्चन नाराज झाल्या होत्या. तर जाणून घेऊया ऐश्वर्याने कोणकोणत्या अभिनेत्यांसोबत इंटिमेट सीन दिले आहेत.

मोहनलाल- इरुवर
चित्रपट ‘इरुवर’मध्ये ऐश्वर्याने अभिनेता मोहनलालसोबत इंटिमेट सीन दिले होते. हा चित्रपट १९९७ मध्ये रिलीझ झाला होता. त्यावेळी ऐश्वर्या २४ वर्षाची होती, तर मोहनलाल ३७ वर्षाचे होते.

संजय दत्त- शब्द
ऐश्वर्याने संजय दत्तसोबतही बरेच बोल्ड सीन दिले आहेत. चित्रपट ‘शब्द’मध्ये या दोघांचे अनेक इंटिमेट सीन दाखवण्यात आले होते. त्यावेळी संजय दत्त ऐश्वर्या रायपेक्षा १४ वर्षाने मोठा होता. (aishwarya bachchan gave bold scenes sanjay dutt to ranbir kapoor)

हृतिक रोशन- धूम २
ऐश्वर्या राय आणि हृतिक रोशनचा ‘धूम २’ हा चित्रपट २००६ साली रिलीझ झाला होता. या चित्रपटात ऐश्वर्याने हृतिकसोबत तिचा पहिला ऑनस्क्रीन किसिंग सीन दिला होता. ज्यामुळे तिला बऱ्याच टीकेचा सामना करावा लागला होता.

रणबीर कपूर- ए दिल है मुश्किल
साल २०१६मध्ये आलेल्या ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटात ऐश्वर्याने तिच्यापेक्षा ९ वर्षाने लहान रणबीर कपूरसोबत खूप बोल्ड सीन दिले होते. त्यावेळी रणबीर आणि ऐश्वर्याच्या इंटिमेट सीनची बरीच चर्चा झाली होती. वृत्तानुसार, हे इंटिमेट सीन पाहून तिची सासू जया बच्चन खूप नाराज झाल्या होत्या. चित्रपटाची स्क्रीनिंग त्यांच्या घरीच करण्यात आली होती. मात्र तरीही जया या स्क्रीनिंगमध्ये सामील झाल्या नव्हत्या.

अभिनेत्रीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर २००९ साली तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २००७ साली ऐश्वर्या राय विवाहबंधनात अडकली. त्यानंतर तब्बल आठ वर्षांनी म्हणजेच २०१५ ला तिने ‘जझ्बा’ या चित्रपटातून पुन्हा चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिने बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘मोहब्बते’, ‘बंटी और बबली’, ‘हम किसीसे कम नही’ यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकेकाळी संजय दत्तवर प्रेम करायची माधुरी दीक्षित; मात्र अभिनेता जेल गेल्यानंतर बदललं सर्वकाही; असा होता ‘संजुबाबा’चा प्रवास

-अभिनेता ते साधूपर्यंत किस करण्यामुळे वादात राहिलीय शिल्पा शेट्टी; कोर्टाने जारी केला होता वॉरंट

-गौरीला ‘शक्ती : द पॉवर’मध्ये नव्हती आवडली शाहरुखची ओव्हर ऍक्टिंग; म्हणाली ‘सगळ्यात’ वाईट चित्रपट

हे देखील वाचा