बी-टाऊनच्या अभिनेत्रीबद्दल अनेकदा मीडियामध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगताना आपण बघतो. अगदी अभिनेत्रींच्या वेषभूषा, त्यांचा मेकअप, त्यांचे फोटो, सिनेमे, अफेयर, लग्न यापासून ते अगदी त्यांच्या वैयक्तिक जीवनापर्यंत अनेक मुद्द्यांवर या चर्चा होतात. जर अभिनेत्रींचे लग्न झाले असेल, तर त्यांना फॅन्सकडून सोशल मीडियावर किंवा पत्रकार एक प्रश्न हमखास विचारतात की, त्या अभिनेत्री आई कधी होणार? लग्नानंतर अभिनेत्री जेव्हा त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतात, तेव्हा त्या फोटोंवरून देखील अनेक बातम्या यायला लागतात. सध्या एका अभिनेत्रीचे फोटो असेच सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावरून ती अभिनेत्री प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या येत आहेत. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून, ती आहे विश्वसुंदरी ऐश्वर्या राय. (Aishwarya Rai Bachchan Is Pregnent Second Time?)
मागील काही काळापासून सतत ऐश्वर्या राय दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या येत आहेत. नुकतेच ऐश्वर्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये तिचे वजन वाढलेले दिसत असून, थोड्या प्रमाणात तिचे बेबीबंप देखील दिसत आहे. यावरून सोशल मीडियावर ऐश्वर्या प्रेग्नेंट असल्याचे बोलले जात आहे.
Fan moment for @varusarath5 …With @juniorbachchan #AishwaryaRai and daughter ❤️ pic.twitter.com/vFlYsNbv1o
— sridevi sreedhar (@sridevisreedhar) July 25, 2021
ऐश्वर्या अभिषेक आणि आराध्यासोबत नुकतीच दाक्षिणात्य अभिनेता सरथकुमारच्या घरी गेली होती. यावेळी ती सरथकुमारच्या मुली वरलक्ष्मी आणि पूजा यांना पॉंडिचेरीमध्ये भेटली. या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ऐश्वर्याने काळ्या रंगाचा ड्रेस घातला असून, ती सिंपल मेकअप मध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये ती अतिशय सुंदर तर दिसतच आहे. शिवाय तिचे वजनही वाढलेले वाटत आहे आणि नीट बघितल्यास पोट देखील मोठे वाटत आहे. यावरूनच ऐश्वर्या पुन्हा प्रेग्नेंट असल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर या फोटोंवर कमेंट्स करतांना फॅन्स देखील हाच प्रश्न विचारत आहे.

दरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी २००७ साली लग्न केले आणि त्यानंतर २०११ साली आराध्याचा जन्म झाला. आता ऐश्वर्या राय पुन्हा प्रेग्नेंट असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दुःखद! ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री जयंती काळाच्या पडद्याआड; झोपेत असतानाच घेतला त्यांनी अखेरचा श्वास