दुःखद! ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री जयंती काळाच्या पडद्याआड; झोपेत असतानाच घेतला त्यांनी अखेरचा श्वास


गेल्या अनेक दिवसांपासून सिनेसृष्टीतून दुःखद बातम्या समोर येत आहेत. यातच भर म्हणजे आणखी एक दुःखद बातमी समोर येत आहे. सोमवारी (२६ जुलै) प्रख्यात कन्नड अभिनेत्री जयंती यांचे निधन झाले आहे. या बातमीने अवघ्या सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

जयंती यांचा मुलगा कृष्णा कुमारने त्यांच्या मृत्युच्या बातमीला दुजोरा दिला आहे. वयाशी संबंधित समस्यांमुळे त्या अस्वस्थ झाल्या होत्या आणि वयाच्या ७६व्या वर्षी अभिनेत्रीने झोपेत असतानाच या जगाला निरोप दिला. बेंगलुरू टाईम्सच्या वृत्तानुसार, कृष्णा कुमारने सांगितले की, “त्या सर्व आजारांपासून बऱ्या होत होत्या. परंतु शेवटी झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.”

जयंती यांनी अनेक भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. मात्र कन्नड चित्रपटांमध्ये त्यांना खरी ओळख मिळाली. जयंती कन्नड सिनेमाच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक होत्या. तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी यासह अनेक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री जयंती यांनी, त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारही जिंकले आहेत. या अभिनेत्रीने सात वेळा कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार आणि दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला आहेत. (kannada film actress jayanthi no more dies in her sleep)

महत्वाचे म्हणजे, २०१८ मध्ये जयंती यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती. तेव्हा त्यांनी स्वतः पुढे येऊन स्पष्टीकरण दिले होते. आता त्यांच्या निधनाने दक्षिण सिनेसृष्टीत शोकाचे वातावरण पसरले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकार त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दुःखद!! अनु मलिक यांच्या आईचे निधन; अरमान मलिकने भावुक पोस्ट शेअर करत दिली माहिती

-‘मुख्यमंत्र्यांचं घराणं हे कलाकारांचं घराणं आहे…’, कलाकारांची परवड थांबवण्यासाठी लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची मुख्यमंत्र्यांना आर्त हाक!

-जेमी लिव्हर अन् जेसी लिव्हरचा धमाकेदार व्हिडिओ आला समोर; ‘जलेबी बेबी’ गाण्यावर थिरकली भाऊ-बहिणीची जोडी


Leave A Reply

Your email address will not be published.