शो सोडल्याच्या चर्चांवर मुनमुन दत्ताने लावला पूर्णविराम; म्हणाली, ‘…तुम्हाला खरं जाणून घेण्याचा अधिकार आहे’


टीव्ही असो किंवा चित्रपट कलाकारांबाबत अफवा उठताना आपण अनेकदा बघतो. मग त्या अफवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असो किंवा व्यायसायिक आयुष्याशी संबंधित. या अफवांमुळे अनेकदा कलाकारांबाबत चुकीच्या बातम्या देखील मीडियामध्ये यायला लागतात. टेलिव्हिजन विश्वात काम करणाऱ्या कलाकारांबाबत अनेकदा बऱ्याच अफवा उठताना आपण बघतो. सेटवरील वाद, कलाकारांच्या मालिका सोडण्याबाबत, नवीन कलाकारांच्या एन्ट्रीबाबत आदी अनेक बातम्या आपण ऐकतो. मागील अनेक दिवसांपासून टीव्ही विश्वातील सर्वात लोकप्रिय शो असणाऱ्या ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ मालिकेतील प्रसिद्ध असणाऱ्या बबिताजी म्हणजेच मुनमुन दत्ताबद्दल काही अफवा उडवल्या जात आहे. त्या अफवांवर आता स्वतः मुनमुनने उत्तर दिले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून या मालिकेतील बबिताजी हे पात्र साकारणारी मुनमुन दत्ता ही अभिनेत्री शोमध्ये दिसत नव्हती. त्यामुळे तिने ही मालिका सोडल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. जवळपास २ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून ती मालिकेत दिसली नसल्याने या चर्चा रंगत आहेत. मात्र आता या सर्व चर्चांवर मुनमुनने पुढे येऊन स्पष्टीकरण दिले आहे.

मुनमुनने सांगितले की, “बऱ्याच दिवसांपासून माझ्या कानावर मी तारक मेहता शो सोडल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र यासर्व बातम्या खोट्या असून, त्या निव्वळ अफवा आहेत. मी मालिकेच्या सेटवर नाही, हे जरी खरे असले, तरी मी मालिका सोडली आहे असे नाहीये. सध्या या शोमध्ये माझ्या उपस्थितीची गरज नाही. त्यामूळे मी सेटवर जात नाही. या चुकीच्या बातम्यांचा माझ्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतोय.” taarak mehta ka ooltah chashmah munmun dutta reaction on quitting the show)

photocourtesy: instagram/munmun dutta

पुढे मुनमुन म्हणाली, “मालिकेची स्टोरीलाइन अथवा सीन्स मी ठरवत नाही. ते सर्व प्रोडक्शन ठरवते. प्रोडक्शन जेव्हा मला बोलवेल तेव्हा मी नक्कीच सेटवर जाईल. मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे. जी कामावर जाते आणि काम संपवून येते. जेव्हा कधी मी हा शो सोडेल तेव्हा नक्कीच सर्वांना याबद्दल सांगेल. कारण जे प्रेक्षक या शोसोबत भावनिक पद्धतीने जोडले गेले आहेत, त्यांना खरे जाणून घेण्याचा अधिकार आहे.”

मालिकेची टीम एक महिन्यापूर्वीच दमन येथील शूटिंग संपवून मुंबईत परतली आहे. मात्र मुंबईत आल्यापासून या शोसाठी अभिनेत्री मुनमुन दत्तासाठीची कोणती स्क्रिप्ट सुद्धा लिहिली जात नसल्याचे बोलले जात होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दुःखद!! अनु मलिक यांच्या आईचे निधन; अरमान मलिकने भावुक पोस्ट शेअर करत दिली माहिती

-‘मुख्यमंत्र्यांचं घराणं हे कलाकारांचं घराणं आहे…’, कलाकारांची परवड थांबवण्यासाठी लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची मुख्यमंत्र्यांना आर्त हाक!

-जेमी लिव्हर अन् जेसी लिव्हरचा धमाकेदार व्हिडिओ आला समोर; ‘जलेबी बेबी’ गाण्यावर थिरकली भाऊ-बहिणीची जोडी


Leave A Reply

Your email address will not be published.