Tuesday, June 6, 2023

ऐश्वर्या रायचा पासपोर्ट बघून हैराण झालेत चाहते; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘हे कसं शक्य आहे!’

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे. कोणतीही सर्जरी आणि मेकअप न करताही ऐश्वर्या नेहमीच खूप सुंदर राहिली आहे. अशातच आता ऐश्वर्याचा पासपोर्ट सोशल मीडियावर समोर आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पासपोर्टमधील एक बाब सर्वांना आश्चर्यचकित करणारी आहे आणि ती म्हणजे अभिनेत्रीचा फोटो.

ऐश्वर्याचा पासपोर्ट फोटो झाला व्हायरल
अनेक वर्षे जुन्या पासपोर्टवर, विश्वसुंदरीचा दशकांपेक्षा जुना फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. खरं तर, सामान्यतः सरकारी आयडीवरील लोकांचे फोटो फारसे चांगले दिसत नाही. परंतु पासपोर्टवरही अभिनेत्रीचा सुंदर फोटो दिसत आहे, जो पाहून चाहते दंग झाले आहेत. (aishwarya rai bachchan passport document gone viral)

ऐश्वर्याचे सौंदर्य पाहून सर्वच झालेत थक्क
समोर आलेल्या पासपोर्टमध्ये ऐश्वर्याचा फोटो पाहिल्यानंतर लोक म्हणत आहेत की, हा जगातील एकमेव असा पासपोर्ट आहे ज्यावर कोणाचा तरी फोटो इतका सुंदर आहे. अभिनेत्रीचा हा पासपोर्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

चित्रपटांबद्दल बोलली ऐश्वर्या राय
ऐश्वर्या राय बच्चनला नुकतेच विचारण्यात आले की, ती अधिकाधिक चित्रपट का करत नाही. यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री म्हणाली, “माझे प्राधान्य अजूनही माझे कुटुंब आणि माझी मुलगी आहे. मणिरत्नमचा ‘पोन्नीयिन सेल्वन’ हा चित्रपट मोठ्या मेहनतीने पूर्ण झाला आहे. मी माझ्या कुटुंबावर आणि आराध्यावर केंद्रित असलेले लक्ष बदलू इच्छित नाही.” दरम्यान अभिनेत्री लवकरच मणिरत्नमच्या ‘पोन्नीयिन सेल्वन’ या चित्रपटात दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची खूप उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा