Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

नील अन् ऐश्वर्याने लग्नानंतर पहिल्यांदाच केला रोमँटिक फोटो शेअर, चाहत्यांच्या उमटतायेत प्रतिक्रिया

‘गुम है किसी के प्यार में’ फेम विराट आणि पाखी म्हणजेच नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांनी नुकतेच लग्न करून एकमेकांना आयुष्याचे जोडीदार म्हणून घोषित केले आहे. मालिकेत वहिनी आणि दिराचे पात्र निभावणारे हे कलाकार वैयक्तिक आयुष्यात पती-पत्नी झाले आहेत. त्यांनी त्यांची हळद, मेहेंदी, संगीत, लग्न, रिसेप्शन या सगळ्याचे फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यानंतर ऐश्वर्याने नुकतेच नीलसोबत काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर सध्या जे फोटो व्हायरल होत आहेत, त्यात आपण पाहू शकतो की, नवविवाहित जोडपे नील आणि ऐश्वर्या बेडरूममध्ये रोमँटिक पोझ देताना दिसत आहे. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. (Aishwarya Sharma and Neil bhatt share first wedding night photo after wedding)

या फोटोमध्ये दोघे एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे. तिने हे फोटो शेअर करून एक रोमँटिक कॅप्शन देखील दिले आहे. तिने “जरा जरा,” असे लिहिले आहे. या फोटोवर तिचे चाहते सातत्याने कमेंट करत आहेत. अनेकजण या फोटोवर हार्ट ईमोजी आणि फायर ईमोजी पोस्ट करत आहेत. तसेच त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देखील देत आहेत.

ऐश्वर्याने शेअर केलेला हा फोटो त्यांच्या लग्नानंतरचा नाही तर प्री-वेडिंग शूटचा आहे. या गोष्टीची माहिती तिने तिच्या पोस्टमध्ये दिली आहे. तिने सांगितले आहे की, हे तिचे प्री-वेडिंग शूट आहे.

नील आणि ऐश्वर्याने उज्जैन येथे ३० नोव्हेंबर रोजी त्यांच्या परिवाराच्या आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले आहे. त्यांनी गुरुवारी (२ डिसेंबर) रोजी रिसेप्शन पार्टी देखील दिली आहे. त्यांच्या या पार्टीमध्ये अनेक कलाकार सामील झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा