Wednesday, February 21, 2024

इंटरनेशनल ट्रांसजेंडर डे ऑफ व्हिजिबलीटी दिवसाच्या निमित्ताने सुश्मिता सेनच्या ‘त्या’ पोस्टने वेधले लक्ष

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन मागील अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच सुश्मिताने तिला हार्ट अटॅक येऊन गेला आणि तिची सर्जरी झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. त्यानंतर सतत ती लाइमलाईट्मधे आहे. या सर्जरीतून पूर्ण बरी झाल्यानंतर सुश्मिता कामावर परतली आणि तिच्या आगामी ‘ताली’ चित्रपटाचे डबिंग तिने पूर्ण केले.

नुकतीच सुश्मिताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने ३१ मार्च इंटरनेशनल ट्रांसजेंडर डे ऑफ विज़िबिलिटी च्या निमित्ताने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ट्रांसजेंडर एक्टिविस्ट गौरी सावंत यांच्यासोबत दिसत आहे.

सुश्मिता सेनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती आणि गौरी सावंत या एकसमान जग बनवण्याबद्दल बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “आता टाळी वाजणार प्रोत्साहन देण्यासाठी!!! या आंतरराष्ट्रीय ट्रांसजेंडर डे ऑफ विज़िबिलिटीच्या दिवशी आपण सर्वांनी मिळून सगळ्यांना एकत्र घेऊन सामान जग बनवण्यासाठी हात मिळवू. ही आहे प्रेम, शक्ती आणि एकताचा शक्तिशाली प्रवास.”

सुश्मिता लवकरच तिच्या आगामी ‘ताली’ सिनेमात गौरी शिंदे ही भूमिका साकारताना दिसणार आहे. हा सिनेमा ट्रांसजेंडर एक्टिविस्ट यांची खरी कहाणी आहे. या चित्रपटाला दिग्दर्शक रवी जाधव यांनी दिग्दर्शित केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांचा झाला ‘रहस्यमयी’ मृत्यू घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला होता मृतदेह

‘आदिपुरुषला बॉयकॉट करा’ म्हणत नेटकऱ्यांनी चित्रपटाच्या नव्या पोस्टरवरील ‘त्या’ चुकीवर घेतला आक्षेप

हे देखील वाचा