Monday, February 26, 2024

अजय देवगनच्या ‘शैतान’ चित्रपटाचा पहिला पोस्टर आउट; यादिवशी रिलीज होणार चित्रपट

मध्यंतरी ‘भोला'(Bhola) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेता अजय देवगनकडे सध्याला अनेक प्रोजेक्ट आहेत. त्यात ‘सिंघम अगेन’ पासून ‘रेड 2′(Raid 2)पर्यंतच्या चित्रपटाचा समावेश आहे. नुकतेच अजयने त्याच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर त्याच्या सोशल मिडियावर रिलीज केला आहे. या चित्रपटाचे नाव ‘शैतान ‘ असून पोस्टरसोबतंच सिनेमाची रिलीज डेटदेखील अजयने प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. 8 मार्च 2024ला हा चित्रपट रिलीज होणार असून, अजय देवगनसोबतंच आर माधवन आणि जोतिका देखील महत्त्वाच्या भुमिकेत दिसणार आहेत.

विकास बहल करणार चित्रपटाचे दिग्दर्शन
अजय देवगन(Ajay Devgan) अभिनित हा सुपरनॅचरल थ्रीलर सिनेमा आहे.चित्रपटाच्या पोस्टरवरून हा चित्रपट भीती निर्माण करणारा असणार असल्याचा अंदाज लावला जातोय. पोस्टर पाहून चित्रटाची कथा जादूटोन्याच्या अवतीभोवती घुमणार असल्याचेही अंदाज लावले जातायत. यासोबतंच हा चित्रपट ‘वश’ नावाच्या गुजराती चित्रपटाचा हिंदी रीमेक असल्याच्या चर्चांनाही उधान आलं आहे. ‘शैतान'(Shaitan) नावाने रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल (Vikas Bahl)करत आहेत. यापुर्वी विकास बहल यांनी गणपत, गुड बाय, सुपर 30 , क्वीन आणि चिल्लर पार्टी यांसारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे.

पहिल्यांदाच आर.माधवन आणि अजय देवगन दिसणार एका पडदायावर
अजय देवगनने आज त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.त्याचसोबत त्याने चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दलही या पोस्टमध्ये सांगितले आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले, “तुमच्यासाठी ‘शैतान’ येत आहे. 8 मार्च 2024ला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.” या सिनेमात आर.माधवन (R.madhavan) आणि अजय देवगन पहिल्यांदाच एका पडदायावर दिसणार आहेत.”

यूजर्सने दिली सकारात्मक प्रतिक्रिया
अभिनेता अजय देवगन गतवर्षी ‘भोला’ या चित्रपटात दिसला होता. जरी हा सिनेमा बाॅक्स ऑफिसवर अप्रभावी ठरला असला तरी सध्याला या चित्रपटाला ओटीटी प्लॅटफाॅर्म ऍमेझाॅन प्राइम विडियोवर प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. ‘शैतान’ सोडूनही अजय ‘सिंघम अगेन'(Singham Again),’रेड 2 ‘ आणि ‘मैदान’ (maidan)यांसारख्या चित्रपटात दिणार आहे. अजय देवगनने शेअर केलेल्या ‘शैतान’ च्या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरवर यूजर्सनी प्रचंड कमेंट केल्या आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले आहे,’आता अजय देवगन घाबरवणार’ दुसऱ्या यूजरने विचारले, ‘ ही भितीदायक फिल्म आहे? ‘

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

2023 ची आठवण काढत सोनम कपूर झाली भावूक; पतीच्या आजाराचा खुलासा करत म्हणाली, ‘गेले वर्ष चढ-उतारांनी भरलेले’
आयुष्मान खुराणाला लागले अकादमी पुरस्काराचे वेध, सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा