आपल्या आवडत्या कलाकारांचे सिनेमे आपल्याला नेहमीच आवडतात आणि आनंद देऊन जातात. कलाकारांचे चाहते हे नेहमी त्यांच्या चित्रपटांबद्दल अपडेट असतात. फॅन्सला आपल्या आवडत्या सेलेब्रिटीच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील जाणून घ्यायला खूप आवडते. आपले आवडते कलाकार वैयक्तिक आयुष्यात कसे आहे, ते कसे जीवन जगतात, कसे राहतात, हे जाणून घेण्यासाठी फॅन्समध्ये नेहमीच उत्सुकता दिसून येते. सोशल मीडियावरही अनेकदा फॅन्स कलाकरांना याबद्दल विचारताना दिसतात.
या सर्वांमध्ये चाहत्यांना कलाकारांच्या घराबद्दल देखील खूपच कौतुक असते. सध्या कोरोना काळ असूनही हिंदी सिनेसृष्टीमध्ये घरं खरेदी करण्याचा ट्रेंड सुरु आहे. काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूरने घर खरेदी केले, त्यानंतर अर्जुन कपूरने घर घेतले आता बॉलिवूडच्या सिंघमने देखील जुहू परिसरात घर खरेदी केले आहे. हे घर आता त्याच्या राहत्या ‘शिवशक्ती’ बंगल्यापासून जवळच असल्याचे सांगितले जात आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, अजय देवगणने त्याचा हा नवीन बंगला ४७.५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केला आहे. ४७४.४ स्क्वेअर मीटर एरिया असलेल्या या बंगल्यासाठी अजयने १८.७५ कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याची बातमी आहे. मात्र, याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली, तरीही राज्याच्या जवळच्या लोकांनी त्याने बंगला घेतल्याची माहिती खरी असल्याचे सांगितले आहे.
अजयने या घराचा सौदा मागील वर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्येच केल्याचे सांगितले जात आहे. कपोल को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये असणारा अजयचा हा नवा बंगला त्याने भावेश बालकृष्ण वालिया व्यक्तीकडून घेतला आहे. सध्या अजय त्याच्या परिवारासोबत ‘शिवशक्ती’ नावाच्या बंगल्यात राहत आहे. सर्वात आधी बातमी आली होती की, अजयने हा बंगला ६० कोटी रुपयांना विकत घेतला आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, अजय आणि काजोल मागील अनेक दिवसांपासून नवीन घराच्या शोधात होते. अजयने हा नवीन बंगला त्याच्या आईच्या वीणा देवगण यांच्या नावावर घेतला आहे. अजयच्या या नवीन घरामुळे सध्या तो माध्यमांमध्ये चांगलाच चर्चेत आला आहे.
अजयच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले, तर तो शेवटचा ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ सिनेमात दिसला होता. हा सिनेमा सुपरहिट झाला. अजयच्या येणाऱ्या सिनेमांबद्दल सांगायचे झाले, तर तो लवकरच ‘सूर्यवंशी’, ‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये पाहुण्या मात्र महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या त्याच्या हातात ‘आरआरआर’, ‘भुज’, ‘मैदान’, ‘थँक गॉड’ आणि ‘मेडे’ हे सिनेमे आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बापमाणूस!’, ‘पितृदिना’निमित्त सिद्धूची खास पोस्ट आली समोर; होतोय प्रेमाचा वर्षाव