Monday, July 1, 2024

आर माधवनचा ‘शैतान’ चित्रपटातील फर्स्ट लुक आऊट; थ्रिलर अन् बरंच काही…

सिनेसृष्टीत मॅडी या नावानं लोकप्रिय झालेला आर माधवन बऱ्याच काळानंतर चर्चेत आला आहे. दाक्षिणात्य अन् हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा अभिनेता पुन्हा एकदा सर्वांच्याच काळजाचा ठाव घेत आहे. सध्या त्याच्या नव्या शैतान नावाच्या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे.

आर माधवनचा ‘शैतान’ चित्रपटातील फर्स्ट लुक आऊट झाला आहे. आपल्या क्युटश्या स्माईलने तरुणींना घायाळ करणारा आर माधवन शैतान चित्रपटात वेगळ्याच भूमिकेत दिसत आहे. नेहमी रोमँटीक सीन्स देणाऱ्या माधवनचा लुक शैतान चित्रपटात खतरनाक दिसत आहे. माधवनने शैतानमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. ज्यामध्ये साऊथ अभिनेत्री ज्योतिका आणि अजय देवगण यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहे.

चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याची सुरुवात माधवनच्या व्हॉईसओव्हरने होते. टीझरमध्ये तो म्हणतो, ‘हे जग पूर्णपणे सुंदर आहे, पण सगळे म्हणतात ते माझे आहे. मी काळ्यापेक्षा काळी आहे, मी फसवणुकीचा प्याला आहे. मी कोणालाच सोडत नाही. एक खेळ आहे, खेळाल का? या खेळाचा एकच नियम आहे, मी काहीही बोललो तरी माझी दिशाभूल करू नका.’ असं म्हणत तो ट्रेलरमध्ये चित्रपटातील त्यांच्या पात्राची ओळख करून देतो.
हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित करण्यात येणार आहे. विकास बहल यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच अजय देवगन, ज्योती देशपांडे, कुमार पाठक आणि अभिषेक पाठक यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात अजय देवगन, ज्योतिका आणि आर माधवन हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

डॉन ३ मध्ये प्रियांकाची जागा घेणार आता ‘ही’ अभिनेत्री, रणवीरसोबत पहिल्यांदाच झळकणार
‘या’ अभिनेत्रिला M. S. Dhoni ने लव्ह गुरु बनत दिला होता मोलाच सल्ला

हे देखील वाचा