Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड रणवीर सिंग नाहीतर बॉलिवूडचा ‘सिंघम’ होता ‘बाजीराव मस्तानी’साठी निर्मात्याची पहिली आवड, पुढे झाले असे की…

रणवीर सिंग नाहीतर बॉलिवूडचा ‘सिंघम’ होता ‘बाजीराव मस्तानी’साठी निर्मात्याची पहिली आवड, पुढे झाले असे की…

रणवीर सिंगने (ranveer singh) खूप हिट सिनेमे दिले आहेत. त्याला बॉलिवूडचा एनर्जी किंग म्हटलं जातं. त्याने लागोपाठ सगळेच सिनेमे हिट दिले आहेत. या हिट सिनेमांमध्ये संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ हा सिनेमा देखील येतो. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप हिट झाला. या सिनेमामध्ये रणवीर बरोबरदीपिका पदुकोण दिसली होती. या दोघांची जोडी सुपरहिट ठरली. परंतु खरं तर संजय लीला भन्साळी यांची पहिली पसंत रणवीर सिंगच्या जागी अजय देवगन ही होती. अजय देवगन हा सिनेमा करू शकला नाही असं नेमकं कारण काय होतं?

‘बाजीराव मस्तानी’ हा सिनेमा २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली होती. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ही जोडी या सिनेमात झळकली. रणवीर सिंगच्या करियरमधला हा सर्वाधिक महत्त्वाचा सिनेमा ठरला. या सिनेमानंतर त्याच्या करिअरला एक वेगळीच ऊर्जा मिळाली. त्या सिनेमात रणवीर सिंग बाजीराव पेशव्यांची भूमिका केली आहे. परंतु संजय लीला भन्साळी यांची पहिली पसंत अजय देवगन होती. (ajay devgan was first choice of sanjay leela bhansali for bajirao mastani movie)

 

अजय देवगनला (Ajay devgan) हा सिनेमा ऑफर झाला होता. परंतु अजय देवगनने हा सिनेमा नाकारला. एका मुलाखतीत त्याने सांगितले देखील हा सिनेमा मला मिळाला होता परंतु पैसे, तारखा आणि अजून काही गोष्टी नसल्यामुळे मी हा सिनेमा केला नाही.

‘बाजीराव मस्तानी’च्या शुटींग साठी संजय लीला भन्साळी यांना अजय देवगनचे २०० दिवस हवे होते परंतु त्याच वेळी अजय देवगन त्याच्या दुसऱ्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. या सिनेमाचं दिग्दर्शन तो स्वतः करत होता. या सर्व कारणांमुळे त्याने ‘बाजीराव मस्तानी’ हा सिनेमा नाकारला.

हेही वाचा :

पुष्पा राजच्या स्टाईलने नेहा कक्करलाही लावले वेड, ‘ओ अंटावा’वर केला डान्स व्हिडिओ शेअर

मीरा राजपूतने शेअर केला शाहिदसोबतचा आतापर्यंतचा सर्वात रोमँटिक फोटो, आरशासमोर दिसले लिपलॉक करताना

अरे व्वा! धनुष आणि ऐश्वर्याने घटस्फोटाचा निर्णय घेतला मागे, हैद्राबादमध्ये एकाच हॉटेलमध्ये झाले कैद

 

हे देखील वाचा