×

पुष्पा राजच्या स्टाईलने नेहा कक्करलाही लावले वेड, ‘ओ अंटावा’वर केला डान्स व्हिडिओ शेअर

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्करला देखील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना अभिनित ‘पुष्पा’ चित्रपटाने वेड लावले आहे. चित्रपटातील गाण्यांवर लाखो रिल्स तयार होत असताना नेहा कशी मागे राहील. कारण तिला सोशल मीडिया सेन्सेशनही म्हणतात. होय, नेहा ही अशी भारतीय गायिका आहे जिची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. ती सतत तिच्या मजेदार पोस्टद्वारे लाखो चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. नेहा गायनात पारंगत असली तरी तिचे डान्सचे कौशल्यही उत्तम आहे. हे तिच्या लेटेस्ट व्हिडिओवरून स्पष्टपणे दिसून येते. ज्यामध्ये तिने ‘पुष्पा’च्या आयटम नंबरवर धमाकेदार डान्स केला आहे. तिच्या या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.

सोशल मीडियावर नेहाचा डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल

नेहाने (neha kakkar) शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती ‘पुष्पा’ चित्रपटातील समंथा रुथ प्रभूवर चित्रित केलेल्या ‘ओ अंटावा’ गाण्यावर वाळूवर डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या गाण्यावर रील बनवण्यासाठी नेहाने एक खास जागा निवडली आहे. तिचे एक्सप्रेशनही चाहत्यांची मने जिंकत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “नेहा खूप क्यूट दिसत आहे.” तर दुसऱ्या युजरने “सुपर क्यूट” असे लिहिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Neha Kakkar (Mrs. Singh) (@nehakakkar)

‘ओ अंटावा’ नेहा कक्करने दाखवली सिझलिंग मूव्ह्ज

इंद्रावती चौहानच्या ‘ओ अंटावा’ या गाण्यात नेहाने तिच्या सिझलिंग मूव्ह्ज दाखवल्या आहेत. चाहते तिच्या डान्सचे खूप कौतुक करत आहेत आणि तिला डान्सिंग क्वीन म्हणत आहेत. नेहा तिच्या सुंदर स्मितहास्याने रीलची सुरुवात करते आणि नंतर चाहत्यांना तिच्या कातील अदेने घायाळ करते.

नेहाच्या आधी कॉमेडियन भारती सिंगनेही या गाण्यावर एक रील शेअर केली होती. ज्यामध्ये ती अभिनेता मिथुन चक्रवर्तीसोबत बोल्ड एक्सप्रेस देताना दिसली होती. मात्र, मिथुनदा तिच्या आजोबांच्या वयाचा असल्याने तिला काही युजर्सने ट्रोल देखील केले होते.

प्रेग्नेंसीबद्दल सांगितली ‘ही’ गोष्ट

नेहा सध्या तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे खूप चर्चेत आहे. तिच्या प्रेग्नेंसीची बातमी कळताच नेहाने चाहत्यांसोबत एक व्हिडिओही शेअर केला की, ती प्रेग्नंट नाही, ती एकदम गुबगुबीत झाली आहे. ती म्हणते की, “नेहा कक्कर देखील गुबगुबीत असू शकते. याचा अर्थ असा नाही की, ती प्रेग्नंट आहेत.” त्यानंतर या सगळ्या अफवा असल्याच्या उघडकीस आले.

हेही वाचा :

Latest Post