Wednesday, July 2, 2025
Home कॅलेंडर सर्वांची बोलती बंद करणाऱ्या कपिलची अजयने केली बोलती बंद, वाचा कशी केली फजिती

सर्वांची बोलती बंद करणाऱ्या कपिलची अजयने केली बोलती बंद, वाचा कशी केली फजिती

टेलिव्हजनवरचा सर्वात मोठा, लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘द कपिल शर्मा शो’ ओळखला जातो. प्रेक्षकांचा संपूर्ण आठवड्याचा शीण काढणारा हा शो म्हणजे लोकांच्या टेन्शनला एक उत्तम पर्याय आहे. प्रत्येक आठवड्यात या शो मध्ये वेगवेगळे कलाकार येत असतात. कपिल आणि पाहुणे कलाकार एकमेकांसोबत मस्ती मजाक करत प्रेक्षकांना हसवण्याचे काम करतात. नुकतेच या शोमध्ये अजय देवगण आणि अभिषेक बच्चन आले होते. यावेळी या दोघांनी कपिल शर्मा सोबत खूप मस्त मज्जा केली. मस्ती मस्ती मध्ये अजयने कपिलला असा एक प्रश्न विचारला, जो ऐकल्यावर कपिलची बोलतीच बंद झाली.

या कार्यक्रमात अजय देवगण, अभिषेक बच्चन, कपिल शर्मा आणि अर्चना पुरण सिंग यांनी खूप मजा केली. अजय, अभिषक आणि अर्चना या तिघांनी मिळवून कपीलची खूप खिल्ली उडवली. या दरम्यान अजयने कपिल शर्माला असा प्रश्न विचारला ज्याचे उत्तर न देता त्याने अजयला थेट प्रश्नच बदलण्याची विनंती केली. कपिलच्या शो मध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक कलाकार येत असतात. यात अनेक अभिनेत्रीचा देखील समावेश असतो. कपिल नेहमीच त्या शो मध्ये आलेल्या अभिनेत्रींसोबत फ्लर्ट करताना दिसतो. मात्र कपिलचे लग्न झाल्यापासून त्याचे असे फ्लर्ट करणे कमी झाले आहे. यावरूनच अजयने कपिलसोबत खूप मजा केले. अजयने कपिलची खेचत त्याला विचारले की, ‘कपिलचे फ्लर्टींग आम्हाला खूप आवडत असल्याचे अनेक लोकं सोशल मीडियावर नेहमी म्हणत असतात .’

अजयने असे म्हटल्यावर कपिलकडे पाहिले. त्यावर कपिल म्हणाला, “हो खरंच लोकं माझे फ्लर्टिंग मिस करत आहे.”  अजय त्यावर म्हणाला, “आणि तुझी बायको?” अजयचा हा प्रश्न ऐकताच कपिल एकदम शांत होत म्हणतो, “तुमचा अर्थ असा आहे ना की आता आपण विषय बदलावा?” हे ऐकून सर्व लोकं हसायला लागतात.

दरम्यान अजय आणि अभिषेक या कार्यक्रमात त्यांच्या आगामी ‘द बिग बुल’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आले होते. अभिषेक या सिनेमात मुख्य भूमिका निभावत असून, अजयने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा हर्षद मेहताच्या घोटाळ्यावर आधारित आहे. अभिषेक या सिनेमात हर्षद मेहतांच्या भूमिकेत दिसणार आहे.

हे देखील वाचा