Saturday, December 7, 2024
Home बॉलीवूड ‘चलेया’ गाण्याची अजिंक्य राऊतला भुरळ, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केले एक्सप्रेशनचे कौतुक

‘चलेया’ गाण्याची अजिंक्य राऊतला भुरळ, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केले एक्सप्रेशनचे कौतुक

शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही जोरदार कमाई करत आहे. या चित्रपटातील शाहरुख खानचा लूक आणि गाणी अजूनही सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. या चित्रपटातील ‘चलेया’ गाण्यावर अभिनेता अजिंक्य राऊतने जबरदस्त डान्स केला आहे. त्याने हा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये अजिंक्य राऊत ‘चलेया’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. त्याचा हा डान्स चाहत्यांना खूप आवडला आहे. अजिंक्यच्या या डान्सवर त्याच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अजिंक्य सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. तो त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. जो चांगलाच व्हायरल झाला आहे.

अजिंक्यच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. कमेंट करताना एकाने लिहिले की, ‘क्या बात है’तर दुसऱ्याने लिहिले की, ‘नक्कीच तू अशा रील्स कर. कारण तू खूप छान डान्स करतो. तसंच तू डान्स करताना खूप कमी दिसतोस, त्यामुळे तुझा डान्स बघायला नक्कीच आवडेल’तर आणखी एकाने लिहिले की, ‘डान्स करत राहा. अजून बघायला आवडेल.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajinkya Raut (@ajinkyathoughts)

शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आजपर्यंत जगभरात 637.23कोटींची कमाई केली आहे.या चित्रपटाने भारतात 566.08 कोटींची कमाई केली आहे. तर, जगभरात या चित्रपटाने 41.15 कोटींची कमाई केली आहे. ‘जवान’ हा चित्रपट 2 जून रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. या चित्रपटातील शाहरुख खानचा लूक आणि गाणी अजूनही सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.

दरम्यान, सध्या अजिंक्य ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत त्याने राजवीरची भूमिका साकारली आहे. या मालिकेतील अजिंक्यच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. (Ajinkya Raut song Chaleya from Shahrukh Khan film Jawaan is a hit)

आधिक वाचा-
सुट्टी न मिळाल्याने जेव्हा ओम पुरी यांनी सोडली होती नोकरी, ‘अशी’ झालेली चित्रपटसृष्टीत एंट्री
प्रसाद ओकने स्वप्नील जोशीला दिल्या हटके अंदाजात शुभेच्छा; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा