Tuesday, March 5, 2024

प्रसाद ओकने स्वप्नील जोशीला दिल्या हटके अंदाजात शुभेच्छा; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी 18 ऑक्टोबरला त्याच्या वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने दिग्दर्शक प्रसाद ओकने एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रसाद ओक स्वप्नील जोशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यात काहीतरी अनपेक्षित घडते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो.

व्हिडिओमध्ये प्रसाद ओक स्वप्नील जोशीला (Swapneel Joshi ) वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. पण त्याचवेळी स्वप्नील जोशीही तिथे येतो. प्रसाद ओक स्वप्नील जोशीला पाहून म्हणतो, “तू बरा आहेस ना?” स्वप्नील जोशी विचारतो, “म्हणजे?” प्रसाद ओक म्हणतो, “अरे इथे तूच का आलास? मी तुलाच वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय.” स्वप्नील जोशी म्हणतो, “अरे तिकडे का शुभेच्छा देतोय? आता मी समोर आहे ना, मला शुभेच्छा दे ना…” प्रसाद ओक म्हणतो, “समोरून.. त्यांनी काही होत नाही. समोर माणूस आला, मिठ्ठी मारली, शुभेच्छा दिल्या त्यांनी काहीही होत नाही. यातून समाधान मिळत नाही. सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या पाहिजेत. तू जा.”

या व्हिडिओवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी स्वप्नील जोशीला शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अमृता खानविलकर, श्रृती मराठे, सुखदा खांडकेकर, नम्रता संभेराव अशा बऱ्याच कलाकारमंडळींनी स्वप्नील जोशीला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी लवकरच ‘जिलबी’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात शिवानी सुर्वेही प्रमुख भूमिका साकारणार आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे.

स्वप्नील जोशीने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ आणि ‘कृष्णा’ या मालिकांमधून तो घराघरात पोहोचला. त्यानंतर स्वप्नीलने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्याचे बरेच चित्रपट सुपरहिट ठरले. काही चित्रपटातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. एवढंच नाहीतर ‘समांतर’ या वेब सीरिजमधून आपल्या दमदार अभिनयाने स्वप्नीलने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली. (A video of Prasad Oak wild wishes to Swapneel Joshi went viral on social media)

 

आधिक वाचा-
मन सुन्न करणारी बातमी! सिनेविश्व गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, चाहते शोकसागरात
सुट्टी न मिळाल्याने जेव्हा ओम पुरी यांनी सोडली होती नोकरी, ‘अशी’ झालेली चित्रपटसृष्टीत एंट्री

हे देखील वाचा