Friday, April 4, 2025
Home कॅलेंडर ठाकरे सरकार शब्दाला जागलं; गानसम्राज्ञी लता मंगेशकर संगीत विद्यापीठासाठी १०० कोटी जाहीर

ठाकरे सरकार शब्दाला जागलं; गानसम्राज्ञी लता मंगेशकर संगीत विद्यापीठासाठी १०० कोटी जाहीर

महान गायिका स्वर्गीय भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने बांधण्यात येणाऱ्या गानसम्राज्ञी लता दिनानाथ मंगेशकर संगीत विद्यापीठासाठी ठाकरे सरकारने भलीमोठी रक्कम जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प शुक्रवार (११ मार्च) रोजी विधीमंडळात मांडण्यात आला. यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी लता मंगेशकर संगीत विद्यापीठ उभारण्यासाठी सरकार १०० कोटी रुपये देत असल्याचे घोषीत केले. (Ajit Pawar Anounce 100 Corore Rupees to Lata Mangeshkar Music University)

ठाकरे सरकारच्या या घोषणेमुळे संगीत प्रेमी आणि लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. तसेच संगीत विद्यापीठ उभारुन लता मंगेशकर यांना खरी श्रद्धांजली अर्पण करण्याचा शब्द महाविकास आघाडीकडून पूर्ण केला जाणार असल्याचे संकेतही सरकाने दिले आहेत. (Lata Mangeshkar Music University)

हेही वाचा – …म्हणून लता मंगेशकर अविवाहित असूनही लावत होत्या कुंकू, गानकोकीळेच्या आयुष्यातील ‘त्या’ घटनेचा झाला खुलासा

लता मंगेशकर यांचे अंतिमसंस्कार ज्या ठिकाणी करण्यात आले, त्या शिवाजी पार्क मैदानात लतादिदींचे स्मारक तयार करण्यात यावे, या मुद्द्यावरुन दोन गट पडले होते. त्यावर अनेक राजकीय व्यक्तींनी त्यांच्या स्वप्नांतील संगीत विद्यापीठ उभारुन त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी, तेच स्मारक ठरेल असा विचार मांडला होता. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांनी लता मंगेशकर विद्यालयासाठी शंभर कोटींची तरतूद करुन संगीतप्रेमींना दिलासा दिला आहे.

(Ajit Pawar Anounce 100 Corore Rupees to Lata Mangeshkar Music University In Economic Budget 2022 Of Maharashtra)

अधिक वाचा

आधी श्रद्धांजली, आता राजकारण? लता मंगेशकर यांचे शिवाजी पार्क येथे स्मारक उभारण्यावरून वाद

स्वरकोकीळा लता मंगेशकर यांच्या अस्थींचे नाशिकच्या पवित्र रामकुंडात झाले विसर्जन

लता मंगेशकर अनंतात विलीन! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी घेतले अंत्यदर्शन; वाचा दिवसभरातील घडामोडी एका क्लिकवर | RIP LATA MANGESHKAR

हे देखील वाचा