Friday, November 22, 2024
Home मराठी पूनम पांडेच्या पब्लिसिटी स्टंटला अजित पवार देखील पडले बळी, भरसभेत श्रद्धांजली वाहत म्हणाले, ‘खूप कमी वयात गेली…’

पूनम पांडेच्या पब्लिसिटी स्टंटला अजित पवार देखील पडले बळी, भरसभेत श्रद्धांजली वाहत म्हणाले, ‘खूप कमी वयात गेली…’

अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) हिने गर्भाशयाच्या मुखाशी असणाऱ्या कॅन्सरबद्दल जनजागृती करण्यासाठी पोस्ट केली. सर्वाइकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाचा कॅन्सर निधन झाले आहे. असे तिने सांगितले. त्यानंतर तिच्या मृत्यूच्या बातम्या सगळीकडे पसरल्या. परंतु तिने 3 फेब्रुवारी रोजी स्वतःच एक व्हिडिओ शेअर करून ती जिवंत असल्याचे सांगितले.

कॅन्सर बाबतची ही जनजागृती केल्याचा एक स्टंट असल्याचा त्यांनी सांगितलं. त्यामुळे सोशल मीडियावर दिला मोठ्या प्रमाणात रोल करण्यात आले. परंतु आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तिच्या या स्टंटबद्दल काहीच माहित नव्हते. त्यांनी केवळ तिच्या मृत्यू झाल्याची बातमी वाचली होती आणि त्यानंतर त्यांनी एका कार्यक्रमात पुनम पांडेला श्रद्धांजली देखील राहिली.

अजित पवार हे सोलापूर शहरातील महानगरपालिका आरोग्य केंद्रात आयोजित असणाऱ्या महिला सर्व लोकसभेला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी महिलांना काळजी घेण्यास सांगितली. या भाषणात अजित पवार यांनी पूनम पांडे हिच्या मृत्यूची देखील माहिती दिली आणि तिला श्रद्धांजली वाहिली.

ही श्रद्धांजली वाहताना ते म्हणाले की, “धकाधकीच्या जीवनात काम करत असताना कधी कोणता आजार होईल सांगता येत नाही कमी वयाची पांडे म्हणून अभिनेत्री होती. तिला गंभीर हजार झाल्याने फार कमी वयात ते आपल्याला सोडून गेली. मला एकच सांगायचं आहे की, तुम्ही पण काळजी घ्या आम्ही पण सरकार म्हणून तुमची काळजी घेऊ. महानगरपालिका ही तुमची काळजी घेईल.”

परंतु ही श्रद्धांजली वाहून झाल्यानंतर अजित पवार यांना समजले की, पूनम पांडे हिने हा स्टंट केला होता. पूनम पांडेने जनजागृतीसाठी केलेला हा मार्ग अनेकांना पटला नाही. आणि तिच्यावर जोरदार टीका होत आहेत. त्याचप्रमाणे अनेक कलाकारांनी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केलेली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

कर्करोग जनजागृती दिन: बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांनी केली कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावर यशस्वी मात
पैसे वाचवण्यासाठी रुपाली गांगुली चालायची तब्बल 15 किमी, सांगीतला संपूर्ण अनुभव

हे देखील वाचा