Saturday, July 27, 2024

कर्करोग जनजागृती दिन: बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांनी केली कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावर यशस्वी मात

आज 7 नोंव्हेबर आजच्या दिवशी राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन साजरा केला जातो. कॅन्सरबाबत माहितीचा प्रसार करणे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाय शोधून त्यांना प्रोत्साहन देणे हे जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यामागील उद्दिष्ट आहे. मधल्या काही काळापासून कॅन्सर खूपच वेगाने पसरत आहे. सामान्य काय आणि कलाकार काय कोणीच कॅन्सरच्या विळख्यातून सुटताना दिसत नाही. बॉलिवूडमधील देखील अनेक कलाकरांना कॅन्सरची लागण झाली होती. या सर्व कलाकारांनी सकारात्मकतेने या जीवघेण्या आजारातून स्वतःला मुक्त केले. आज आपण या लेखातून अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेऊया ज्यांनी या आजारावर यशस्वी मात केली.

सोनाली बेंद्रे :
अभिनेत्री सोनाली बेंद्रेला देखील कॅन्सर झाला होता. ती नेहमीच सोशल मीडियावर प्रेरणादायी कथा सर्वांसोबत शेअर करत असते. सोनालीला २०१९ साली कॅन्सरचे निदान झाले. तिने परदेशात जाऊन कॅन्सरवर उपचार घेत या आजारावर यशस्वी मात केली. या दरम्यान तिने अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला.

ताहिरा कश्यप :
अभिनेता आयुष्यमान कुराणाची पत्नी असलेल्या ताहिरा कश्यपला २०१८ साली ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने याची माहिती दिली. या आजाराविरुद्ध तिने खूप मोठी लढाई लढली आणि ती जिंकली देखील.

मनीषा कोईराला :
मनीषाच्या आयुष्यात तिने अनेक चढ उतार पाहिले. यातच तिला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. वयाच्या ४२ व्या वर्षी मनीषला ओवेरियन कॅन्सर झाला. तिने परदेशात जाऊन यावर उपचार घेतले. या आजारातून बरे होण्यासाठी तिला बरेच वर्ष लागले. ती पूर्ण बारी होऊन भारतात आली आणि आता चित्रपटांमध्ये देखील सक्रिय आहे.

किरण खेर :
चित्रपटांमध्ये आणि रियालिटी शोमध्ये सतत दिसणाऱ्या दिग्गज अभिनेत्री असलेल्या किरण खेर यांना देखील कॅन्सरची लागण झाली होती. त्या बरीच काळ चित्रपटांपासून लांब होत्या. अभिनेते अनुपम खेर यांनी याबद्दल माहिती दिली होती. मात्र त्या आता यातून बऱ्या झाल्या असून, कामावर देखील परतल्या आहे.

संजय दत्त :
अभिनेता संजय दत्तला देखील कॅन्सरची लग्न झाल्याची बातमी एक दिवस अचानक आली आणि सर्व हैराण झाले. त्याचे फॅन्स त्याच्यासाठी सतत प्रार्थना करत होते. मात्र कमी काळातच त्याने कॅन्सरला मात दिली.

राकेश रोशन :
अभिनेता ऋतिक रोशनचे वडील आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांना देखील कॅन्सर झाला होता. मात्र त्यांनी देखील त्यावर यशस्वी मात केली. आता ते उत्तम आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘ही’ अभिनेत्री लढतेय कॅन्सरसोबत, सोशल मीडियावर केस फोटो आत्मविश्वासाने केले पोस्ट

‘पेन किलरही काम करत नाहीये…’, ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देणार्‍या छवी मित्तलची भावुक पोस्ट

हे देखील वाचा