Tuesday, March 5, 2024

आकांक्षा दुबेच्या आत्महत्येनंतर बॉयफ्रेंडने सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट, म्हणाला

भोजपुरी मॉडेल आणि अभिनेत्री असणाऱ्या आकांक्षा दुबेने २६ मार्च रोजी आत्महत्या केली आणि सर्वांना मोठा धक्का बसला. भोजपुरी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती. वयाच्या केवळ २५ व्या वर्षी तिने हे पाऊल उचलल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. भोजपुरी इंडस्ट्रीमधील कलाकारांनी देखील तिच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. यातच तिचा मित्र, बॉयफ्रेंड असलेल्या समर सिंगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

समर सिंगने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले, “निशब्द. RIP # आकांक्षा दुबे.” यासोबतच त्याने एक रडणारी दुखी ईमोजी देखील पोस्ट केली आहे. तत्पूर्वी आकांक्षाने व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्ताने आकांक्षा दुबेने तिचे आणि समर सिंगचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samar Singh (@samarsinghh)

यासोबतच भोजपुरी इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री असलेल्या अक्षरा सिंगने देखील आकांक्षाच्या निधनावर दुःख व्यक्त केले असून, तिने तिच्या पोस्टमध्ये तिच्याबद्दल लिहिले आहे. अक्षराने आकांक्षाचा फोटो शेअर करत लिहिले, “काय लिहू काय बोलू हे समजत नाहीये. कालचा तुझा मसेज कुठे दीदी वाराणसीमध्ये, मला अजून विश्वास बसत नाही होत ती बहादूर मुलगी होती जिने तिच्या आईवडिलांना एक उत्तम आयुष्य देण्याचे ठरवले होते. अजूनही वेळ आहे मुलींनो उठा जाग्या व्हा काहीही चुकीचे करण्याआधी आपल्या आईवडिलांचा नक्की विचार करा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshara Singh (@singhakshara)

दरम्यान आकांक्षा दुबे वाराणसीमध्ये शूटिंगसाठी गेली होती. तिच्या युनिटमधल्या लोकांनी तिला संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला मात्र काहीच प्रतिसाद आला नाही म्हणून त्यांनी हॉटेलमध्ये जात मास्टर चावीने दरवाजा उघडला तर ती गळफास घेतलेल्या अवस्थेत होती. आकांक्षाने भोजपुरीमध्ये ‘मेरी जंग मेरा फैसला’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘वीरों के वीर’, ‘फाइटर किंग’, ‘कसम पैदा करने की 2’ आदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तुझे प्रेम फक्त माझ्यासाठी ‘ म्हणत सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनसाठी तुरुंगातून लिहिले अजून एक प्रेमपत्र
‘ये काली काली आँखें…’ दीपिकाचा लेटेस्ट फाेटाेशूट पाहिलात का?

हे देखील वाचा