सध्या बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ हा त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षाही जास्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. टायगर हा अभिनेत्री दिशा पटानी हिच्यासोबतच्या ब्रेकअपमुळे जोरदार चर्चेत आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, टायगर आणि दिशा दोघांचेही मार्ग वेगळे झाले आहेत. मात्र, या दोघांकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण समोर आले नाहीये.
अशात टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि दिशा पटानी (Disha Patani) यांच्यासोबत मागील काही दिवसांपासून अभिनेत्री आकांक्षा शर्मा (Akanksha Sharma) हिचेही नाव जोडले आहे. माध्यमांमध्ये असे सांगितले जात आहे की, टायगर आणि दिशाच्या ब्रेकअपचे कारण आकांक्षा आहे.
खरंच आकांक्षा शर्मा आहे का टायगर- दिशाच्या ब्रेकअपचे कारण?
माध्यमांमध्ये सांगितले जात आहे की, ६ वर्षांपासून डेट करत असलेल्या दिशा हिला सोडून टायगर हा अभिनेत्री आकांक्षासोबत आयुष्यात पुढे जात आहे. त्यामुळे आकांक्षा हीच टायगर आणि दिशा या दोघांच्याही ब्रेकअपचे कारण मानले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगरच्या आयुष्यात आकांक्षाची एन्ट्री झाली आहे. दुसरीकडे, टायगर आणि दिशाच्या वेगळे होण्याच्या चर्चांना मागील काही दिवसांपासूनच सूर गवसला आहे.
यामध्ये पुढे असेही म्हटले गेले आहे की, जेव्हा टायगरला व्हॉट्सअप मेसेजद्वारे आकांक्षाला डेट करण्याबद्दल विचारले गेले, तेव्हा त्याने हे नाकारले. त्याने पुढे बोलताना सांगितले की, ते दोघे एकमेकांना डेट करत नाहीयेत.
आकांक्षानेही केलंय टायगरसोबत काम
आकांंक्षा शर्मा हिने टायगर श्रॉफसोबत दोन म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले आहे. ‘कॅसानोव्हा’ आणि ‘आय ऍम अ डिस्को डान्सर २.०’ या गाण्यांमध्ये तिने टायगरसोबत ठुमके लावले आहेत. या गाण्यांमध्ये दोघांच्या जोडीला चाहत्यांनी चांगली पसंती दर्शवली होती.
टायगर श्रॉफचे आगामी सिनेमे
टायगर श्रॉफ याने २०१४ मध्ये ‘हिरोपंती’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते. यानंतर त्याने जवळपास १५ हून अधिक सिनेमात काम केले आहे. तो ‘गणपत’, ‘बाघी ४’ यांसारख्या आगामी सिनेमात झळकणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
राकेश झुनझुनवालांची भूमिका साकारून रातोरात स्टार बनला होता ‘हा’ अभिनेता, सोशल मीडियावर रंगलीय चर्चा
‘एवढ्या’ कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे श्वेता तिवारी, ताफ्यात महागड्या गाड्यांचाही समावेश
आता तर ऋतिक रोशनही म्हणाला, ‘आमिर खानचा सिनेमा म्हणजे, एकदम…’