Friday, March 31, 2023

‘एवढ्या’ कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे श्वेता तिवारी, ताफ्यात महागड्या गाड्यांचाही समावेश

छोट्या पडद्यावर काम करून अभिनेत्री नेहमीच नावारुपाला येण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे, ही कामगिरी ते लीलया पारही पाडतात. आजवर अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या अस्सल अभिनयाने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करून प्रत्येक घराघरात आपली ओळख निर्माण केली आहे. याच अभिनेत्रींमध्ये श्वेता तिवारी हिच्या नावाचाही समावेश होतो. श्वेताला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. चाळिशी पार करूनही ती युवा अभिनेत्रींना हॉटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत टक्कर देताना दिसत आहे. श्वेता टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. चला तर जाणून घेऊया श्वेताच्या संपत्तीबद्दल.

अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिचा जन्म 4 ऑक्टोबर, 1980 रोजी प्रतापगड येथे झाला होता. मात्र, तिचे शिक्षण हे मुंबईतून झाले. श्वेताच्या कुटुंबात आई-वडिलांसोबतच एक भाऊदेखील आहे. श्वेता ही मुंबईच्या उच्चभ्रू वस्ती असलेल्या भागात राहते. ती अत्यंत आलिशान आयुष्य जगते. श्वेता ही कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. इतकेच नाही, तर सन 2021नुसार तिची एकूण संपत्ती 11 कोटी असल्याचे सांगण्यात आले होते. श्वेता कोणत्याही शोमध्ये काम करत असते, तेव्हा ती प्रत्येक एपिसोडसाठी लाखो रुपये घेते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

श्वेताच्या महागड्या गाड्या
याव्यतिरिक्त ती ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातूनही कोट्यवधी रुपयांची कमाई करते. श्वेताच्या महागड्या गाड्यांबद्दल बोलायचं झालं, तर तिच्या ताफ्यात अनेक लग्झरी गाड्या आहेत. तिच्याकडे बीएमडब्ल्यू 7 सीरिज ही गाडी आहे. या गाडीची किंमत 1.38 कोटी रुपये आहे. याव्यतिरिक्त तिच्याकडे ऑडी ए४ ही गाडीदेखील आहे. या गाडीची किंमत 47.60 कोटी रुपये आहे. तसेच, तिच्याकडे सँट्रो ही गाडी आहे. या गाडीची किंमत जवळपास ६ लाख रुपये आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

अनेक टीव्ही शो आणि बॉलिवूड सिनेमात केलंय काम
श्वेता हिला एक मुलगी आहे. तिचे नाव पलक तिवारी (Palak Tiwari) असे आहे. पलक हीदेखील लवकरच बॉलिवूड पदार्पण करणार आहे. पलकची आई श्वेता हिच्याबद्दल बोलायचं झालं, तर तिने तिच्या कारकीर्दीची सुरुवात 1999मध्ये ‘कलीरें’ या शोमधून केली होती. यानंतर श्वेता डीडी नॅशनलवर दिसणाऱ्या ‘आने वाला पल’ या शोमध्येही दिसली होती. मात्र, श्वेताला सर्वाधिक प्रसिद्धी ही ‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेतून मिळाली होती. श्वेताने अनेक बॉलिवूड सिनेमातही काम कले आहे. ती 2004 मध्ये ‘मदहोशी’ आणि ‘आबरा का डाबरा’ सिनेमातही झळकली होती. बॉलिवूडव्यतिरिक्त तिने भोजपुरी, पंजाबी, कन्नड, मराठी आणि नेपाली सिनेमातही काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडमध्ये ‘या’ जोडप्याच्या प्रेमाच्या अनेक चर्चा रंगूनही वर्षभरातच घेतला घटस्फोट, जाणून घ्या एका क्लीकवर

‘ब्लॅक पँथर: वकांडा फॉरएव्हर’ जबरदस्त ट्रेलर रिलीज, चॅडविक बोसमन नंतर दिसणार नवा सुपरहिरो

हे देखील वाचा