Monday, July 1, 2024

अंबानी दाम्पत्याचीही सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनला उपस्थिती; पाहा आकाश अंबानी आणि श्लोका मेहताची ग्रँड एंट्री

अंबानी कुटुंबाची लाडकी लेक ईशा अंबानी हिचे अभिनेत्री कियारा अडवाणी साेबत प्रेमळ सबंध आहे. दोघेही लहानपणापासून चांगल्या मैत्रीणी आहेत. 2018 मध्ये जेव्हा ईशा अंबानीने आनंद पिरामलसोबत लग्नगाठ बांधली तेव्हा कियाराने त्यांच्या सर्व लग्न समारंभांना हजेरी लावली हाेती. अशात आता कियाराने सिद्धार्थ मल्होत्राशी लग्न केले तेव्हा ईशा अंबानीने देखील पती आनंदसाेबत लग्नात हजेरी लावली.

कियारा अडवाणी (kiara advani) आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या (sidharth malhotra) रिसेप्शनमध्ये ईशा अंबानीचा भाऊ आकाश अंबानी पत्नी श्लोका मेहतासोबत हातात हात घालून पोहोचला. यावेळी श्लोका मेहता साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. श्लोकाने रंगीबेरंगी थ्रेडवर्क असलेली काळी साडी घातली होती, ज्यासोबतच तिने काळ्या रंगाचे एक यूनिक बेल-स्लीव्ह ब्लाउज परिधान केले होते. श्लोका साडीत कमालीची दिसत होती, तर दुसरीकडे आकाश अंबानी काळ्या रंगाच्या सूटमध्ये देखणा दिसत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

सिड-कियाराच्या लग्नात बाॅलिवूडच्या दिग्गज कालकारांनी लावली हजेरी
लग्न झाल्यापासून सिड-कियारा त्यांच्या लग्नाचा जल्लाेश साजरा करण्यात व्यस्त आहे. जैसलमेरच्या सूर्यगड किल्ल्यावर सात फेऱ्या मारून हे जोडपे लग्न बंधानात अडकले. अशात काल म्हणजेच रविवारी (दि. 12 फेब्रुवारी)ला या जाेडप्यांनी मुंबईत राॅयल रिसेप्शन आयाेजन केले हाेते. ज्यात बाॅलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांचा समावेश हाेता. यावेळी प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन, आलिया भट्ट, नितू कपूर, करण जाैहर, वरुण धवन यासारख्या दमदार कलाकरांनी आपली हजेरी लावली.(akash ambani wife shloka stuns in saree bollywood actress kiara mumbai reception)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सिड-कियाराच्या रिसेप्शनचा व्हिडीओ आला समोर, मेव्हण्यासोबत जोरदार नाचला ‘शेरशाह’

मोनोकिनीमध्ये बीचवर स्टंट करणे पडले निया शर्माला महाग, मग जे झाले त्याचा झाला व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा