Wednesday, February 21, 2024

रिसेप्शन आमिर खानच्या लेकीचं, पण मैफिल लुटली आर्ची- परश्याच्या मराठमोळ्या लूकने, पाहा फोटो

नुकतेच बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान नुकतेच लग्न बंधनात अडकली आहे. तिने मुंबईत कोर्ट मॅरेज केले. आणि त्यानंतर उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. तिने तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले. आत्ताच मुंबईमध्ये आयरा आणि नुपूर यांचे वेडिंग रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शनला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. बॉलिवूड सहित मराठीतील आणि कलाकारांनी या रिसेप्शनला हजेरी लावली होती.

आमिर खानच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये मराठमोळा अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी देखील हजेरी लावली होती. आमिर खानच्या मुलीच्या रिसेप्शनला आर्ची आणि परश्या यांना आमंत्रण कसे आलं हा विचार सगळेच करत आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा हा लूक बघून देखील सगळे थक्क झाले आहेत. पार्टीतील त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आकाश आणि रिंकू फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे.

या रिसेप्शन पार्टीला रिंकू अगदी मराठमोळ्या स्टाईलमध्ये दिसून आली आहे. तिने निळ्या रंगाची साडी नेसली आहे. आणि अगदी सिम्पल लुक केलेला आहे. त्याचप्रमाणे तिने केसांचा बन घातलेला आहे. आकाश देखील काळया रंगाच्या सूटमध्ये दिसला आहे. या दोघांचा हा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

तब्बल सात महिने घालवून बनवलाय आयरा खानचा लेहेंगा, सोन्याच्या जरीसोबत केलीये ‘ही’ खास गोष्ट
‘राम मंदिर ट्रस्टला यापूर्वीच 14 लाख रुपयांची देणगी केलीये दान, ‘हनुमान’ दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांचा खुलासा

हे देखील वाचा